Sunny Deol | ‘त्या’ बातम्यांमुळे सनी देओल संतापला, म्हणाला मी स्वत: जोपर्यंत..
'गदर 2 ' ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर सनी देओल आणखीनच मोठा स्टार बनला आहे. या चित्रपटानंतर आता याचा पुढचा भाग 'गदर'चा तिसरा पार्टही बनणार असल्याचे वृत्त आहे. एवढंच नव्हे तर सनी देओल याचा आणखी एक सुपरहिट चित्रपट असलेल्या 'बॉर्डर' चा ही सिक्वेल येत असल्याच्या चर्चा सुरू आहेत
मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : ‘गदर 2 ‘ ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर सनी देओल आणखीनच मोठा स्टार बनला आहे. या चित्रपटानंतर आता याचा पुढचा भाग ‘गदर’चा तिसरा पार्टही बनणार असल्याचे वृत्त आहे. एवढंच नव्हे तर सनी देओल याचा आणखी एक सुपरहिट चित्रपट असलेल्या ‘बॉर्डर’ चा ही सिक्वेल येत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र यामुळे सनी देओल प्रचंड संतापला आहे. असं काही असेल तर मी स्वत: घोषणा करेन, असं त्याने स्पष्ट केलंय.
एवढंच नव्हे तर केवळ ‘गदर’ आणि ‘बॉर्डर 2’ हेच न्वहे तर सनी देओलच्या ‘इंडियन’ आणि ‘अपने’ या चित्रपटांचेही पुढचे भाग येत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या सगळ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर सनीची प्रतिक्रिया आली आहे. ‘मी किती चित्रपटांचे सीक्वेल, पार्ट टू करणार’ असं सनीने म्हटलं आहे.
एका मुलाखतीदरम्यान सनीला त्याच्या या सगळ्या चित्रपटांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा टो म्हणाला, जेव्हापासून ‘गदर 2’ आला आहे, तेव्हापासून अशा बातम्या फिरत आहेत की मी याचा पार्ट 2 करतोय, त्याचा पार्ट 2 करतोय.. अरे मी किती पार्ट 2 करतोय ? प्रत्येक गोष्टीबाबत अफवा सुरू आह. लोकांनी अटकळ बांधणं चांगलं आहे, पण असं काही ( चित्रपटाचा सिक्वेल) असेल तर मी स्वत: त्याची घोषणा करेन.
सनी देओलचे आगामी चित्रपट
सनी देओल वर नमूद केलेल्या चित्रपटांच्या पुढच्या पार्टमध्ये नसला तरी तो ‘लाहोर 1947’ या चित्रपटात दिसणार असून त्याचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार असून, अभिनेता आमिर खान त्याचा प्रोड्युसर आहे. या चित्रपटावर गेल्या 15-17 वर्षांपासून काम सुरू आहे, पण काही झालं नव्हतं. ‘गदर 2 ‘च्या यशानंतर हा चित्रपट करण्याचा निर्णय झाला.
याशिवाय सलनी देओल हा ‘सफर’ चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रटाच्या शूटिंगदरम्यान एका सीनमुळे सनी खूप चर्चेत आला होता. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये सनी देओल हा दारूच्या नशेत अडखळत रस्त्यावर चालत असल्याचे दिसत होते. त्यावरून बरीच चर्चा सुरू झाल्यावर, तो शूटिंगचा सीन असल्याचे सनीने स्पष्ट केले होते.