सनी देओल-सलमान तर सोडाच शाहरूखही तोडू शकला नाही आमिर खानचा हा रेकॉर्ड !
Aamir Khan Have A Big Record At Box Office: बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आमिर खान गेल्या 35 वर्षांपासून सातत्याने चित्रपटांमध्ये काम करत आहे. यामुळे त्याचे जगभरात जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत. आमिर खानने त्याच्या करिअरमध्ये बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. त्याचा एक असा रेकॉर्ड आहे, जो आजपर्यंत कोणीही अभिनेता मोडू शकलेला नाही.
नवी दिल्ली : सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) याला बॉलिवूडमध्ये मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. गेल्या 35 वर्षांपासून तो अथक काम करत असून त्याची यशस्वी फिल्मी कारकीर्द आहे. यादरम्यान, त्याने एकापेक्षा एक अशा सरस चित्रपटांमध्ये (hit movies) काम केले आणि बॉक्स ऑफिसवर आपली आग कायम ठेवली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याच्या चित्रपटांची जादू दिसली नाही, तरीही आमिर हा बॉक्स ऑफिसवर (box office) हिट मशीन आहे.
तसं पहायला गेलं तर बॉक्स ऑफिसवर आमिरच्या नावावर अनेक रेकॉर्ड असले तरी आज आपण त्याच्या अशा एका रेकॉर्डबद्दल बोलणार आहोत, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत असेल आणि जाणून घेतल्यावर बरेच जण आश्चर्यचकित होतील. बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त ब्लॉकबस्टर चित्रपट देण्यात आमिर पहिल्या क्रमांकावर आहे. या बाबतीत कोणताही अभिनेता त्याच्या पुढे नाही. शाहरुख खान, सलमान खान आणि सनी देओल सारखे दिग्गज कलाकारही अजूनआमिरचा हा विक्रम मोडू शकले नाहीत.
कोणता आहे आमिरचा रेकॉर्ड ?
सर्वप्रथम आमिरच्या सर्वकालीन ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल बोलूया. आमिर खानचे बॉक्स ऑफिसवर 5 ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत. 11 नोव्हेंबर 1996 रोजी प्रदर्शित झालेला ‘राजा हिंदुस्तानी’ हा त्याचा पहिला ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट होता, तर 24 डिसेंबर 2009 रोजी प्रदर्शित झालेला ‘3 इडियट्स’ हा दुसरा चित्रपट होता, तिसरा चित्रपट ‘धूम 3’ होता जो 20 डिसेंबर 2013 रोजी प्रदर्शित झाला होता. , चौथा चित्रपट ‘पीके’ होता जो 19 डिसेंबर 2014 रोजी प्रदर्शित झाला आणि पाचवा ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे ‘दंगल’, तो 23 डिसेंबर 2016 रोजी प्रदर्शित झाला.
आता शाहरुख खानबद्दल सांगायचं झालं तर, त्याच्या खात्यात फक्त 2 ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत. त्यात पहिला नंबर आहे तो ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाचा. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झाला होता आणि त्याचा दुसरा चित्रपट होता ‘कुछ कुछ होता है’ जो 16 ऑक्टोबर 1998 मध्ये रिलीज झाला.
त्याच वेळी, बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या खात्यातही फक्त दोनच ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत. 5 ऑगस्ट 1994 रोजी आलेला ‘हम आपके है कौन’ हा सलमानचा चित्रपट ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरला होता. आणि त्याचा दुसरा ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट होता ‘बजरंगी भाईजान’, तो 17 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झाला होता.
आता सनी देओलबद्दल सांगायचं तर त्यानेही आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर फक्त 2 ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यातला पहिला चित्रपट आहे ‘बॉर्डर’, जो 13 जून 1997 रोजी रिलीज झाला होता. आणि दुसरा चित्रपट म्हणजे 15 जून 2001 रोजी रिलीज झालेला ‘गदर’ चित्रपट होय.
हे तिनही अभिनेते आमिरच्या पाच ब्लॉकबस्टर चित्रपटांचा रेकॉर्ड अद्याप मोडू शकलेले नाहीत आणि भविष्यात तो रेकॉर्ड तुटण्याची शक्यताही खूपच कमी वाटत आहे.