Karan Deol Wedding : सनी देओलच्या मुलाने उरकला साखरपुडा, कोण आहे धर्मेंद्र यांची नातसून?

| Updated on: May 03, 2023 | 8:37 PM

ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांचा मुलगा करण देओल पुढील महिन्यात लiग्नबंधनात अडकणार आहे.

Karan Deol Wedding : सनी देओलच्या मुलाने उरकला साखरपुडा, कोण आहे धर्मेंद्र यांची नातसून?
Follow us on

मुंबई : “ये ढाई किलो का हाथ जब किसी पर पडता है ना, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है” हा डायलॉग ऐकला कि सगळ्यांचाच डोळ्यासमोर येतो तो सनी देओल. सनी देओल त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तसंच सनी देओल नेहमीच चर्चेत असतो. पण आता चर्चेत सनी देओल नाही तर त्याचा मुलगा आहे.

अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलचा मुलगा करण देओल पुढील महिन्यात लग्न करणार आहे. करणने काही महिन्यांपूर्वीच गुपचूप साखरपुडा उरकला आहे. त्यामुळे करण सध्या चर्चेत आहे. पण करण कोणत्या मुलीशी लग्न करणार आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार, करणने त्याच्या लेडी लव्हसोबत आजोबा धर्मेंद्र आणि आजी प्रकाश कौर यांच्या लग्नाच्या वाढदिवसाशी साखरपुडा केला आहे. तसंच आता करण जूनमध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता देओल कुटुंबियांनी करणच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू केली आहे.

करणची लेडी लव्ह कोण?

माहितीनुसार, करण देओल ज्या मुलीसोबत लग्न करणार आहे ती फिल्म इंडस्ट्रीतील नाहीये. तसंच करण त्याच्या मंगेतराला खूप दिवसांपासून डेट करत होता. तर आता लवकरच ते दोघेही लग्न करणार आहेत. त्यांचं लग्न अगदी साधेपणाने होणार असून त्यात फक्त जवळचे नातेवाईकच सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

हा आहे करण देओलचा पुढचा चित्रपट

करणने यमला पगला दिवाना 2 या चित्रपटाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्याने 2019 मध्ये पल पल दिल के पास या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तो अपने के अपने 2 या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्रसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

गेल्या वर्षी पसरलेली करण देओलच्या साखरपुड्याची अफवा

मागील वर्षी करणच्या साखरपुड्याची अफवा पसरली होती.  करणने चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात द्रिशा रॉय हिच्याशी साखरपुडा केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.  नंतर करणने याबाबत स्पष्टीकरण देत ही बातमी खरी नसल्याचं सांगितलं.