मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : वर्षाच्या सुरुवातीला अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. यंदाच्या वर्षी अद्याप कोणताही सिनेमा ‘पठाण’ने रचलेला रेकॉर्ड ब्रेक करु शकलेला नाही. पण अभितेने सनी देओल यांच्या सिनेमाची वाटचाल पाहाता ‘गदर २’ सिनेमा ‘पठाण’चा रेकॉर्ड ब्रेक करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या सर्वत्र ‘गदर २’ आणि सिनेमाच्या कमाईची चर्चा रंगली आहे. ‘गदर’ सिनेमानंतर ‘गदर २’ सिनेमाला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. सलग १४ व्या दिवशी सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड रचताना दिसत आहे. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्याच्या कमाईचा वेग मंदावला असला तरी, सिनेमा ‘पठाण’चा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘गदर २’ सिनेमाने १४ व्या दिवशी ८.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजे सिनेमाने आतापर्यंत तब्बल ४१८.९० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर जगभरात सिनेमाने ५३० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या कमाईची चर्चा रंगत आहे.
‘गदर २’ सिनेमाने पहिल्या आठवड्यात २८४.६३ कोटी रुपयांची कमाई केली. आठव्या दिवशी सिनेमाने २०.५ कोटी रुपये, नवव्या दिवशी ३१ कोटी रुपये, दाहव्या दिवशी ३८.९ कोटी रुपये, आकराव्या दिवशी १३.५० कोटी रुपये, बाराव्या दिवशी १२.१० कोटी रुपये आणि तेराव्या दिवशी सिनेमाने १० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशात सिनेमा ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करु शकतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाने ५४३.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘गदर २’ ने ‘द केरला स्टोरी’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २४२.२० कोटी रुपये कमावले होते. आता ‘गदर २’ सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘गदर 2’ आता अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ला मागे टाकत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे ‘गदर 2’ शाहरुख याच्या सिनेमाच्या रेकॉर्ड मोडू शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र ‘गरद 2’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षातील ब्लॉकबास्टर सिनेमा कोणता ठरेल हे पाहणं देखील महत्त्वाचं देखील ठरणार आहे.