तू माझा जीव वाचवलास…सनी लिओनीने 15 वर्षानंतर मानले खास व्यक्तीचे आभार, लिहीली स्पेशल नोट

| Updated on: May 29, 2023 | 1:51 PM

अभिनेत्री सनी लिओन सध्या सातव्या आसमानात आहे. अभिनेत्रीने 'केनेडी' चित्रपटातून नुकतेच कान्समध्ये पदार्पण केले आहे,

तू माझा जीव वाचवलास...सनी लिओनीने 15 वर्षानंतर मानले खास व्यक्तीचे आभार, लिहीली स्पेशल नोट
Image Credit source: instagram
Follow us on

Sunny Leone : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मधील तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे. सनी लिओनी लवकरच अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’ (kennedy) चित्रपटात दिसणार आहे. सनीने ‘केनेडी’ चित्रपटाद्वारे कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (cannes film festival) शानदार पदार्पण केले. सनी लिओनीने पती डॅनियल वेबरसोबत रेड कार्पेटवर एन्ट्री केली तेव्हा चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. पती डॅनियलसोबत घालवलेल्या 15 वर्षांच्या सुंदर प्रवासाबद्दल सनीने एक नोट शेअर करत आभार मानले आहेत.

सनी लिओनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या पतीसाठी एक सुंदर चिठ्ठी देखील लिहिली आहे, ‘मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात असताना देवाने तुला माझ्या आयुष्यात पाठवले. त्यावेळेस तू खरोखरच माझा जीव वाचवलास आणि तेव्हापासून नेहमीच माझ्यासोबत राहिलास. तुझ्यासोबत घालवलेली ही 15 वर्षे खूप छान होती’. अशा शब्दांत सनीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

सनी लिओनीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील पदार्पणाचे श्रेयही तिच्या पतीला दिले आहे. ‘ तू जर माझ्या आयुष्यात आला नसतास तर हा क्षण माझ्या आयुष्यात आला नसता असेही तिने लिहिले आहे. प्रेम व्यक्त करताना अभिनेत्रीने लिहिले आहे की, माझी स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करते, धन्यवाद, असेही सनीने तिच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

याचवेळी सनीने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे, ज्यात ती तिच्या पतीसह हातात हात घालून उभी असलेली दिसत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनी लिओनीने तिच्या पतीसह रेड कार्पेटवर एंट्री केली. दोघांनीही एकत्र फोटोसाठी खूप पोझही दिल्या. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हाय थाय स्लिट गोल्डन ड्रेसमध्ये सनी अतिशय ग्लॅमरस दिसत होती. तर डॅनिअलही खूप हँडसम दिसत होता. सनीची ही पोस्ट डॅनियलहीनेही सोशल मीडियावर शेअर केली आहे.