मुंबई : दक्षिणात्य अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत यांना तीव्र रक्तदाबाचा त्रास झाल्याने शुक्रवारी (25 डिसेंबर) हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘थलायवा’ रजनीकांत सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांचा रक्तदाब अजूनही वाढलेलाच आहे. मात्र, कालपेक्षा काहीशी सुधारणा असल्याचे अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. संध्याकाळी त्यांचा अहवाल आल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात येईल, असा निर्णय घेण्यात येईल. अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रजनीकांत यांचे हेल्थ बुलेटिन जाहीर केले आहे (Superstar Rajinikanth health update by Apollo hospital).
अपोलो रुग्णालयाने जारी केलेल्या हेल्थ अपडेटनुसार- काल रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांचा रक्तदाब अद्याप उच्च पातळीवर आहे. परंतु, कालपेक्षा थोडा नियंत्रणात आहे. त्यांच्या तपासणीत अद्याप कोणतीही अडचण दिसून आली नाही. आज त्यांच्या आणखी काही तपासण्या केल्या जातील. त्यांचा अहवाल आज संध्याकाळपर्यंत येईल. औषधांद्वारे त्यांचा रक्तदाब काळजीपूर्वक नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच, त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि कोणालाही त्यांना भेटण्याची परवानगी नाही.’
सुपरस्टार रजनीकांत गेल्या 10 दिवसांपासून हैदराबादमध्ये चित्रीकरण करत होते. 22 डिसेंबरला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती ती निगेटिव्ह आली असल्याची माहितीही अपोलो रुग्णालयाने दिली होती (Superstar Rajinikanth health update by Apollo hospital).
कोरोना काळातील लॉकडाऊननंतर जवळपास सर्व चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आणि सर्व चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू केले गेले. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे सध्या त्यांच्या ‘अन्नाथे’ (Annaatthe) या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्यांच्या या चित्रपटाच्या सेटवर 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. सेटवर कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 14 डिसेंबरपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते.
या संदर्भात रजनीकांत यांचे प्रवक्ते रियाज अहमद यांनी एका या वृत्तपत्राशी बातचीत केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, ‘चित्रपटाच्या सेटवर उपस्थित लोकांपैकी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. याच कारणास्तव, रजनी सर हैदराबादमध्ये स्वत:ला क्वारंटाईन करतील किंवा चेन्नईला परत येतील.’ परंतु तब्येत बिघडल्याने रजनीकांत यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
(Superstar Rajinikanth health update by Apollo hospital)
Photo : मराठमोळं नाव ते साऊथचे सुपरस्टार ! रजनीकांतचा अफलातून प्रवासhttps://t.co/V4Y5IJRw8s@rajinikanth #RajinikanthBirthday #LifeStory
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 12, 2020