सहाय्यक व्यक्तिरेखेवरील कॉपीराईटमुळे ‘झुंड’ रखडला, प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

झुंड चित्रपटातील अविनाश पॉलच्या जीवनकथेचे कॉपीराईट आपल्याकडे असल्याचा दावा दाक्षिणात्य निर्मात्याने केला आहे.

सहाय्यक व्यक्तिरेखेवरील कॉपीराईटमुळे 'झुंड' रखडला, प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 11:11 AM

नवी दिल्ली : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) चित्रपटाचे नशीब अधांतरीच आहे. ‘झुंड’ चित्रपट प्रदर्शित करण्यास दिवाणी कोर्ट आणि तेलंगणा उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखेवरील कॉपीराईटमुळे ‘झुंड’ रखडला आहे. (Supreme Court declines to lift stay on release of Amitabh Bachchan starrer Jhund)

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेतील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने चित्रपटाचे निर्माते सुपर कॅसेट्सची मागणी फेटाळून लावली. तेलंगणा उच्च न्यायालयाने 19 ऑक्टोबरला आदेश देत भारतासह जगभरात ‘झुंड’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. या आदेशाला चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. वरिष्ठ वकील व्ही. आर. धोंड यांनी सुपर कॅसेट्सच्या वतीने युक्तिवाद केला, तर वरिष्ठ वकील पी. एस. नरसिम्हा यांच्यासह वकील अबिद अली बीरन आणि श्रीराम परकात यांनी प्रतिवादी नंदी चिन्नी कुमार यांची बाजू मांडली.

सार्वजनिक क्षेत्रात (पब्लिक डोमेन) आधीपासूनच उपलब्ध असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सत्य घटना ‘मालमत्ता’ मानल्या जाऊ शकतात का आणि त्या कॉपीराईट संरक्षणास पात्र ठरु शकतात का? हा भारतातील कॉपीराईट कायद्यासंदर्भात महत्त्वाचा प्रश्न या याचिकेत उपस्थित करण्यात आला होता.

याचिकाकर्ते सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (टी-सीरीज म्हणून विख्यात) ने असा दावा केला होता की हा चित्रपट फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. नागराजचा बॉलिवूडमधील हा पहिला सिनेमा आहे.

बारसे यांनी प्रशिक्षण दिलेल्या झोपडपट्टीतील फुटबॉल संघाचा कर्णधार असलेल्या अखिलेश पॉलच्या जीवनावर दाक्षिणात्य भाषेत चित्रपट निर्मिती होत आहे. मात्र हे कॉपीराईटचे उल्लंघन असल्याचे समजून झुंड चित्रपटाच्या प्रदर्शनाविरुद्ध आदेश देणे चुकीचे असल्याचे हायकोर्टात याचिकाकर्त्यांनी सांगितले होते.

अखिलेश पॉल यांच्या जीवनाविषयी चित्रपट बनवण्याचा अधिकार आपण विकत घेतल्याचा दावा चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी केला होता. बॉलिवूड अभिनेता आमिर खानने होस्ट केलेल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात पॉलने हजेरी लावली होती. नंदी चिन्नी कुमार यांनी हा कार्यक्रम पाहून पॉलकडे त्याचा जीवनपट चित्रपटात आणण्याची मागणी केली होती. त्यासाठी आर्थिक मोबदला देण्याची तयारीही दाखवली होती.

विजय बारसे यांच्या जीवनावर सुपर कॅसेट्स सिनेमा तयार करत असल्याचे एप्रिल 2018 मध्ये कुमार यांना समजले. त्यानंतर कुमार यांनी दिवाणी कोर्टात दावा केला की, झुंड या चित्रपटामध्ये पॉलच्या जीवनातील काही मूलभूत गोष्टी असतील, ज्याच्या जीवनकथेचे कॉपीराईट आपल्याकडे आहेत. (Supreme Court declines to lift stay on release of Amitabh Bachchan starrer Jhund)

दिवाणी न्यायालयाने 17 सप्टेंबर 2020 रोजी कुमारच्या बाजूने निकाल दिला आणि खटल्याच्या समाप्तीपर्यंत सुपर कॅसेट्सला चित्रपट प्रदर्शित करण्यापासून रोखले. हा आदेश तेलंगणा उच्च न्यायालयाने 19 ऑक्टोबर रोजी कायम ठेवला. त्यामुळे निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागले.

झुंड हा सिनेमा अखिलेश पॉलबद्दल नाही, तर त्याचे प्रशिक्षक विजय बारसे यांच्यावर असल्याचे सुपर कॅसेट्सने स्पष्ट केले आहे. हा चित्रपट पॉलवर आधारित नाही, तर फुटबॉल टूर्नामेंट जिंकणार्‍या झोपडपट्ट्यांमधील छोट्या गुन्हेगारांच्या कथेवर आहे, असा दावा केला जात आहे.

संबंधित बातम्या :

नागराज मंजुळे दिग्दर्शित बिग बींच्या ‘झुंड’चा टीझर लाँच

(Supreme Court declines to lift stay on release of Amitabh Bachchan starrer Jhund)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.