मुंबई: अभिनेत्री पूनम पांडेला (poonam pandey) सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) दिलासा दिलाय. पॉर्नोग्राफी प्रकरणी (Pornography case) पूनम पांडेला दिलासा मिळालाय. उच्च न्यायालयाने पूनमचा जामिन फेटाळला. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात घेतली. सर्वोच्च न्यायायलाने पूनमला दिलासा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालाचा निर्णय काय आहे?
न्यायमूर्ती विनीत सरन आणि न्यायमूर्ती बी व्ही नगरत्ना यांच्या बेंचसमोर ही सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस जारी केली. पूनमचा जामिन अर्ज फेटाळण्यावर न्यायालयाने आक्षेप घेतला. आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की, ‘याचिकाकर्त्या पूनम पांडेच्या विरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाऊ नये.’
उच्च न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला
पूनम पांडेने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात घेतली. सर्वोच्च न्यायायलाने पूनमला दिलासा दिला आहे.
अश्लील मजकूर तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी पूनम पांडेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्याशी संबंधित आहे. अभिनेत्री पूनम पांडेने अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता, जो न्यायालयाने 25 नोव्हेंबर 2021 रोजी फेटाळला होता.
संबंधित बातम्या