Disha Salian | दिशाच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली!
सुप्रीम कोर्टाने आज झालेल्या सुनावणीत दिशा सालियन प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी नाकारली.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिने देखील सुशांतच्या आत्महत्येच्या काहीच दिवसांपूर्वी घराच्या बाल्कनीतून उडी मारून स्वतःचे आयुष्य संपवले होते. या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरूच आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची (CBI Investigation) मागणी करण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेत सुशांत आणि दिशा यांच्या आत्महत्याचे एकमेकांशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत, याचिका फेटाळून लावली आहे. (Supreme Court refuses plea seeking a court-monitored CBI Investigation in Disha Salian case)
सुप्रीम कोर्टाने आज झालेल्या सुनावणीत दिशा सालियन प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी नाकारली, याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय दिला आहे.
गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तपास करणाऱ्यांना फटकारले होते. या प्रकरणात सुनावणीसाठी कोणी का हजर नाही? मागील तारखेलाही कोणीच सुनावणीसाठी का हजार नव्हते? असे असेल तर न्यायालयाने काय करावे?, असे प्रश्न उपस्थित करत याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. (Supreme Court refuses plea seeking a court-monitored CBI Investigation in Disha Salian case)
Supreme Court refuses to entertain a plea seeking a court-monitored Central Bureau of Investigation (CBI) probe into the death of actor #SushantSinghRajput‘s former manager, Disha Salian.
The Court asks the petitioner to withdraw the plea and approach Bombay High Court with it.
— ANI (@ANI) October 26, 2020
दिशा आणि सुशांत यांच्या आत्महत्यांचा एकमेकांशी संबध असल्याचा दावा
पुनीत कौर धांडा यांनी वकिली विनीत धांडा यांच्यामार्फत न्यायालयात सदर याचिका दाखल केली असून, मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी सविस्तर चौकशी करावी, तसे निर्देश न्यायालयाने द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. या दरम्यान दिशाची केस फाईल हरवली आहे किंवा हटविली गेली आहे, असे म्हटले गेले होते. जर कोर्टाला हे असमाधानकारक वाटले तर, हा खटला पुढील तपासासाठी सीबीआयकडे पाठविला जावा, असे अपील धांडा यांनी न्यायालयात केले होते.
दिशाचा 8 जून रोजी मुंबईच्या मलाड वेस्टमधील रीजेंट गॅलेक्सीच्या 14व्या मजल्यावरून पडल्यानंतर मृत्यू झाला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने या घटनेच्या एका आठवड्यानंतर, 14 जून रोजी सकाळी आत्महत्या केली. त्यामुळे हे प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याची शंका येत असल्याचे या याचिकेत म्हटले होते. शिवाय, दिशा अभिनेता रोहन रायसोबत रिलेशनशिपमध्ये होती. लॉकडाऊननंतर ते दोघे लग्न करणार होते, असा दावाही या याचिकेत करण्यात आला होता.
(Supreme Court refuses plea seeking a court-monitored CBI Investigation in Disha Salian case)