Suraj Pawar : सैराटमधील ‘प्रिन्स’ ला पोलीस करणार अटक ; वाचा सविस्तर
सैराट' प्रिन्सची भूमिका साकारणारा अभिनेता सूरज पवार याचे नावही पोलिस तपासात समोर आले आहे. सूरज पवार हा देखील नोकरीच्या फसवणुकीच्या टोळीचा भाग असल्याची माहिती आहे. सूरज पवारने 'पिस्तुल्या' या शॉर्ट फिल्ममधून नायक म्हणून पदार्पण केले होते. फेंड्री या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसून आला होता.
मराठी चित्रपट सृष्टीत ‘सैराट’ (Siarat)चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील परश्या आणि आर्चीसोबतच आर्चीचा भाऊ प्रिन्सची(prince ) भूमिकाही चांगलीच गाजली होती. प्रिन्सची भूमिका केलेल्या अभिनेता सुरज पवार(Suraj Pawar) बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरज पवारने नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी(Police) त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून लवकरच त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहणारे महेश वाघडेकर यांनी मुंबई मंत्रालयातील कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या काही लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला, ज्यामध्ये अभिनेता सूरज पवाराचेही नावही समोर आले अन घटनेचा उलगडा झाला आहे.
सरकारी नोकरी देण्याचे आमिष
पोलिसात आपल्याला राज्य सचिवालयात सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी दत्तात्रय क्षीरसागर, विष्णू शिंदे, ओंकार तरटे व अन्य एकाला अटक केली आहे.पीडितेकडून पैसे घेतल्याचेही समोर आले आह आरोपींनी महेश वाघडकर यांच्याकडे नोकरीच्या नावाखाली 5 लाखांची मागणी केली. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी राहुरी, अहमदनगर येथील बसस्थानकावर वाघडकर यांच्याकडून 2 लाख रुपये रोख देखील घेतले होते. उर्वरित तीन लाख रुपये रुजू झाल्यानंतर द्यायचे होते. त्यानंतर वाघडकर यांना संशय आला आणि त्यांनी ९ सप्टेंबर रोजी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले.
यामध्ये केल्या होत्या भूमिका
‘सैराट’ प्रिन्सची भूमिका साकारणारा अभिनेता सूरज पवार याचे नावही पोलिस तपासात समोर आले आहे. सूरज पवार हा देखील नोकरीच्या फसवणुकीच्या टोळीचा भाग असल्याची माहिती आहे. सूरज पवारने ‘पिस्तुल्या’ या शॉर्ट फिल्ममधून नायक म्हणून पदार्पण केले होते. फेंड्री या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसून आला होता.