लॉकडाऊननंतर प्रदर्शित झालेल्या Suraj Pe Mangal Bhari चित्रपटाची Box Office वर जादू? पहिल्या दिवशी ‘इतकी’ कमाई

अभिनेता दिलजीत दोसांझ, अभिनेत्री फातिमा सना शेख आणि मनोज वाजपेयी यांचा 'सूरज पे मंगल भारी' हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे.

लॉकडाऊननंतर प्रदर्शित झालेल्या Suraj Pe Mangal Bhari चित्रपटाची Box Office वर जादू? पहिल्या दिवशी 'इतकी' कमाई
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 6:41 PM

मुंबई : कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) देशात मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. देशभरात शाळा-महाविद्यालय, बस, रेल्वे, मॉल्स, बाजार आणि मंदिरांसह चित्रपटगृह बंद करण्यात आली. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार देशात काही ठिकाणी हळूहळू बस, रेल्वे, मंदिरं आणि चित्रपटगृह सुरु करण्यात आली. तब्बल 8 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रुपेरी पडद्यावर चित्रपट झळकू लागले आहेत. (Suraj Pe Mangal Bhari Box Office Collection)

पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि मनोज वाजपेयी (Manoj Bajpai) यांचा ‘सूरज पे मंगल भारी’ (Suraj Pe Mangal Bhari) हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. लॉकडाऊननंतर प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. रविवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार देशभरात 800 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 80 लाख रुपयांची कमाई केली आहे. कोरोना महामारीचा चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. असं म्हटलं जातंय की, कोरोना नसताना हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर चित्रपटाने जास्त कमाई केली असती.

काही चित्रपटगृहांमधील या चित्रपटाचे नाईट शो रद्द करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. मराठा मंदिर आणि Gaiety चित्रपटगृहातील नाईट शो रद्द करण्यात आला आहे. कमीत कमी 30 लोक चित्रपट पाहायला आले तरच चित्रपटाचा शो सुरु केला जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक चित्रपटगृहांमध्ये जाणं टाळत आहेत. चित्रपटाचा शो आयोजित केलेला असूनही कमीत कमी 30 लोकही चित्रपट पाहायला आले नाहीत तर शो सुरु केला जात नाही, परिणामी अनेक ठिकाणी आयोजित शो रद्द करण्यात आले.

कोरोनाच्या परिस्थितीतही ‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटाने 80 लाख रुपयांची कमाई केली आहे, ही आकडेवारी समाधानकारक म्हणावी लागेल. या चित्रपटात मनोज वाजपेयी, दिलजीत दोसांझ, फातिमा सना शेख प्रमुख भूमिकेत आहेत. तर सुप्रिया पिळगावकर, मनोज पाहवा, सीमा पाहवा, अन्नू कपूर आणि विजय राज या दिग्गजांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

इतर बातम्या

Sonu Nigam | ‘माझ्या मुलाने गायक होऊ नये आणि झाल्यास भारतात काम करू नये’, सोनू निगमचे वादग्रस्त वक्तव्य!

‘कोलावेरी डी’नंतर धनुषच्या आणखी एका गाण्याचा यूट्युबवर धुमाकूळ, 100 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार

(Suraj Pe Mangal Bhari Box Office Collection)

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.