Special report : सुशांतसिंहची आत्महत्या नव्हे तर हत्याचं झाली, कूपर रुग्णालयाच्या माजी कर्मचाऱ्याचा दावा नेमका काय?
सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचं रुपकुमार शाह यांना का वाटलं. याबाबत शाह म्हणाले, आम्ही बॉडी निरखून पाहिली. गळ्यावरच्या, अंगावरच्या खुणा बघीतल्या.
मुंबई : सुशांतसिंह राजपुतची आत्महत्या नव्हे तर हत्याचं झाली. असा दावा कूपर रुग्णालयाच्या माजी कर्मचाऱ्यानं केला. ते म्हणाले, सुशांतसिंह राजपूतची बॉडी आहे. ती बॉडी काढली असता तेव्हा समजलं की, मारहाणीच्या खुणा होत्या. गळ्यावर दोन-तीन व्रण होते. दुसरी गोष्ट म्हणजे हातापायाला मुका मार लागल्याचं दिसत होतं, असं माजी कर्मचाऱ्यानं सांगितलं. १४ जून २०२० अभिनेता सुशांतसिंह राजपुतचा मुंबईत राहत्या घरी मृत्यू झाला. सुशांतसिंहनं आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं होतं. मात्र, मुंबई पोलिसांच्या त्याच तपासावर माजी कर्मचाऱ्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एवढचं नव्हे तर सुशांतसिंह राजपुतची आत्महत्या नसून हत्याचं असल्याचा दावाही रुपकुमार शाह यांनी केलाय.
शाह म्हणाले, प्रत्येक बॉडीबाबत डिसकस होतं. सुशांतसिंहची बॉडी पाहिल्यावर मी साहेबांना सांगितलं की, हा खून आहे. त्या पद्धतीनं आपण काम करावं. पण, साहेब म्हणाले इमरजन्सीमध्ये फोटोग्राफी करायची नि बॉडी द्यायचीय. त्याप्रमाण आम्ही पीएम केलं.
सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचं रुपकुमार शाह यांना का वाटलं. याबाबत शाह म्हणाले, आम्ही बॉडी निरखून पाहिली. गळ्यावरच्या, अंगावरच्या खुणा बघीतल्या. गेल्या २८ वर्षांत ५० ते ६० हजार बॉड्या केल्यात. त्यामुळं आम्ही सांगू शकतो की, सुशांतसिंहची आत्महत्या नसून हत्याचं आहे.
१४ जून २०२० ला सुशांतसिंहचा मृतदेह सापडला. १५ जून २०२० ला सुशातसिंहच्या मृतदेहावर विलेपार्लेतील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. १८ जूनला सुशांत सिंहची गर्लफ्रेंड असलेल्या रिया चक्रवर्तीनं वांद्र पोलिसांत जबाब नोंदविला.
४ जुलैला सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर २८ जुलै रोजी के. के. सिंह यांनी पटनामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली.