Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput Case | नव्या फॉरेन्सिक पथकाची नियुक्ती करा, सुशांतच्या वकिलांची मागणी

एम्सच्या अहवालावर आता सुशांतचे वकील विकास सिंह (Vikas Singh) यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, नवीन फॉरेन्सिक पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली आहे

Sushant Singh Rajput Case | नव्या फॉरेन्सिक पथकाची नियुक्ती करा, सुशांतच्या वकिलांची मागणी
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 11:02 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) फॉरेन्सिक टीमने सीबीआयला आपला अहवाल (report) सादर केला आहे. या अहवालात त्यांनी सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळून लावत, त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. एम्सच्या या अहवालावर आता सुशांतचे वकील विकास सिंह (Vikas Singh) यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, नवीन फॉरेन्सिक पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली आहे (Sushant Singh Rajput Adv vikas singh appeals for new forensic team after AIIMS report).

एम्सच्या अहवालानंतर त्यांनी ट्विट करत, ‘एम्सचे पथक प्रत्यक्षात शरीर न पाहता असा निर्णायक अहवाल कसा देऊ शकते?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे. रविवारी विकास सिंह (Vikas Singh) यांनी ट्विट केले की, ‘एम्स पथकाने सीबीआयला सादर केलेल्या अहवालामुळे (AIIMS report) मी अस्वस्थ आहे. मी सीबीआय संचालकांना नवीन फॉरेन्सिक टीम स्थापन करण्यासाठी विनंती करणार आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, ‘एम्सची टीम मृतदेह न पाहता असा निर्णायक अहवाल कसा तयार करू शकते? तेही मुंबईतील कूपर रूग्णालयाच्या अशा पोस्टमॉर्टम अहवालावर, ज्यात मृत्यूची वेळही दिली गेली नाही.’

नवीन फॉरेन्सिक पथक नेमण्यात यावे

यापूर्वी एका वृत्तपत्राशी बोलताना वकील विकास सिंह (Vikas Singh) म्हणाले की, एम्सच्या टीमने सुशांतच्या मृतदेहाची प्रत्यक्षात तपासणी केलेली नव्हती आणि त्यांचा अहवाल केवळ छायाचित्रांवर अवलंबून असल्याने, हा अहवाल निर्णायक मानला जाऊ शकत नाही. त्यामुळे पुन्हा नव्या पथकाची नेमणूक करून या प्रकरणी तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘एम्सचा अहवाल निर्णायक नाही आणि तरीही सीबीआय आरोपपत्रात सुशांत सिंह राजपूतचे मृत्यूप्रकरण हत्येचा गुन्हा म्हणून दाखल करू शकते.’ (Sushant Singh Rajput Adv vikas singh appeals for new forensic team after AIIMS report)

सुशांतची हत्या नसून आत्महत्याच, एम्सचा दावा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. याआधीही एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे या अहवालानंतर, सुशांतप्रकरणात हत्येचा दावा करणारे तोंडघशी पडले आहेत.

(Sushant Singh Rajput Adv vikas singh appeals for new forensic team after AIIMS report)

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा 

Sushant Singh case | ‘एम्स’च्या रिपोर्टने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळला, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

Sushant Singh Rajput Case | सुशांतचा सीबीआय अहवाल लवकरात लवकर यावा; जनतेला सत्य समजलंच पाहिजे : अनिल देशमुख

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.