Sushant Singh Rajput | फॉरेन्सिक रिपोर्ट लीक, सुशांतच्या कुटुंबियांकडून एम्सच्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल!
एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतचा फॉरेन्सिक अहवाल लीक केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या झाली नसून, हे प्रकरण आत्महत्येचेच असल्याचे एम्सने सीबीआयला सादर केलेल्या अहवालात म्हटले होते. एम्सच्या (AIIMS) या अहवालावर सुशांतच्या कुटुंबियांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान, आता सुशांतच्या कुटुंबियांनी एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केल्याची बातमी समोर येत आहे. सुशांत प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयला सुशांतच्या कुटुंबियांच्या वकिलांकडून हे तक्रार पत्र मिळाले आहे. यात त्यांनी एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतचा फॉरेन्सिक अहवाल लीक केल्याचा आरोप केला आहे. (Sushant Singh Rajput case family files complaint against AIIMS doctor)
काही दिवसांपूर्वी एम्सच्या फॉरेन्सिक टीमने सुशांतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूबद्दलचा अहवाल सीबीआयकडे सादर केला होता. या अहवालात सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्याच असल्याचे म्हटले आहे. शिवाय त्यांनी हत्येची शक्यताही फेटाळून लावली आहे. सुशांतचे कौटुंबिक वकिल विकास सिंह यांनी एम्सच्या या अहवालावर प्रश्नचिन्ह लावत, नवीन फॉरेन्सिक टीम नियुक्त करण्याची मागणी केली होती. डेक्कन क्रोनिकलच्या रिपोर्टनुसार, आता सुशांतच्या कुटुंबियांनी एम्सच्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केल्याचे म्हटले जाते आहे.
सीबीआयला दिलेल्या या तक्रार पत्रात, डॉक्टरांनी सुशांतचा फॉरेन्सिक रिपोर्ट लीक केल्याचा आरोप, त्याच्या कुटुंबियांकडून केला गेला आहे. तसेच, एम्सने सादर केलेला हा अहवाल अपुऱ्या पुराव्यांवर आधारित आहे. या रिपोर्टची प्रत मागूनही कुटुंबियांना दिली जात नसल्याचे देखील या तक्रारीत म्हटले आहे. फॉरेन्सिक टीमचे मुख्य हा रिपोर्ट अजूनही सादर करत नाहीयत. केवळ कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. तर, ज्या अहवालात सुशांतच्या मृत्यूची वेळ देखील नोंदवली नाहीय, त्यावर आधारित हा रिपोर्ट निष्कर्षावर कसा पोहचू शकतो, असा प्रश्न सुशांतच्या कुटुंबियांनी केला आहे. (Sushant Singh Rajput case family files complaint against AIIMS doctor)
सुशांतची हत्या नसून आत्महत्याच, एम्सचा दावा
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. याआधीही एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे या अहवालानंतर, सुशांतप्रकरणात हत्येचा दावा करणारे तोंडघशी पडले आहेत.
नवीन फॉरेन्सिक पथक नेमण्यात यावे, सुशांतच्या वकिलांची मागणी
एम्सचा अहवाल सादर झाल्यांनतर सुशांतच्या वकिलांनी त्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. याविषयी बोलताना वकील विकास सिंह (Vikas Singh) म्हणाले की, एम्सच्या टीमने सुशांतच्या मृतदेहाची प्रत्यक्षात तपासणी केलेली नव्हती आणि त्यांचा अहवाल केवळ छायाचित्रांवर अवलंबून असल्याने, हा अहवाल निर्णायक मानला जाऊ शकत नाही. त्यामुळे पुन्हा नव्या पथकाची नेमणूक करून या प्रकरणी तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. ‘एम्सचा अहवाल निर्णायक नाही आणि तरीही सीबीआय आरोपपत्रात सुशांत सिंह राजपूतचे मृत्यूप्रकरण हत्येचा गुन्हा म्हणून दाखल करू शकते’, असेदेखील ते म्हणाले.
Highly perturbed with AIIMS report. Going to request CBI Director to constitute a fresh Forensic team . How could AIIMS team give a conclusive report in the absence of the body,that too on such shoddy post mortem done by Cooper hospital wherein time of death also not mentioned .
— Vikas Singh (@vikassinghSrAdv) October 4, 2020
(Sushant Singh Rajput case family files complaint against AIIMS doctor)
संबंधित बातम्या :
Sushant Singh Rajput Case | नव्या फॉरेन्सिक पथकाची नियुक्ती करा, सुशांतच्या वकिलांची मागणी
Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा