सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वात मोठी कारवाई, रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याला अटक करण्यात आली आहे. एनसीबीने केली अटक सिद्धार्थ याला हैद्राबाद येथून केली.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वात मोठी कारवाई, रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक
सिद्धार्थ पिठाणी
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 12:02 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थ नियंत्रण विभाग अर्थात NCB ने सर्वात मोठी कारवाई केली आहे. NCB ने सुशांतसिंह राजपूतचा रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठाणी (Siddharth Pithani) याला अटक केली आहे. सिद्धार्थला हैदराबादेतून अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज दिल्याच्या कटात हात असल्याचा आरोप सिद्धार्थ पिठाणीवर आहे. सिद्धार्थला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे (Sushant Singh Rajput Case NCB arrest Sushant roommate Siddharth Pithani).

सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत (Sushant Singh Rajput) आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र सुशांतने आत्महत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं.

सिद्धार्थला अटक

सिद्धार्थने घेतली होती सुशांतच्या बहिणींची नावं!

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सुरु झालेल्या सीबीआय चौकशीत सिद्धार्थ पिठानीने सुशांतची बहीण मितू सिंह, प्रियंका, तिचे पती ओपी सिंह या तिघांची नावं घेतली होती. मितू आणि प्रियंका यांना 14 तारखेला फोनवर सुशांतच्या आत्महत्येबाबत माहिती दिल्याचा दावा सिद्धार्थ पिठानीने केला होता. प्रियंका आणि मितू यांच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह फासावरुन खाली उतरवल्याचे देखील सिद्धार्थने सांगितले होते. दीपेशने चाकूने पंख्याला लागलेला दोर कापला होता, तर आपण मृतदेह खाली काढला, असे सिद्धार्थने सीबीआयला सांगितले होते (Sushant Singh Rajput Case NCB arrest Sushant roommate Siddharth Pithani).

सिद्धार्थचा खुलासा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड- अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये 8 जूनला कडाक्याचे भांडण झाले होते, त्यानंतर आयटी प्रोफेशनलला बोलावून सुशांतच्या घरातील 8 हार्ड डिस्क नष्ट करण्यात आली, अशी माहिती सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याच्या केलेल्या चौकशीत समोर आली होती. हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या परदेश दौऱ्याचे फोटो यामध्ये असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला होता. तसेच दोघांच्या कंपन्यांचे महत्त्वाचे कागदपत्रही हार्ड डिस्कमध्ये होते, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

तीन आयटी प्रोफेशनल्सना संपर्क केला गेला होता, एक जण घरी आला होता. माझ्या माहितीप्रमाणे रिया किंवा इतर कुणी बोलावलं असेल. ज्यावेळी डाटा नष्ट केला जात होता, तेव्हा तिथे रिया, सुशांत, दीपेश, नीरज उपस्थित होते, असेही सिद्धार्थ पिठाणी याने सांगितले होते.

(Sushant Singh Rajput Case NCB arrest Sushant roommate Siddharth Pithani)

हेही वाचा :

प्रियंका-मितूच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह खाली उतरवला, सिद्धार्थ पिठानीचा सीबीआय चौकशीत दावा

Sushant Singh | फ्लॅटमधील घडामोडी ते रियासोबतचं नातं, सुशांतचा रुममेटवर सीबीआयकडून प्रश्नांची सरबत्ती

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.