Sushant Singh Rajput | रियासोबत सुशांतच्या बहिणीचा वाद, पाटणा पोलिसांच्या चौकशीत माहिती

सुशांतचा नोकर दीपेश मिरिंडा आणि गार्ड यांची काल चौकशी झाली होती. दीपेशकडून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती आहे

Sushant Singh Rajput | रियासोबत सुशांतच्या बहिणीचा वाद, पाटणा पोलिसांच्या चौकशीत माहिती
Follow us
| Updated on: Jul 30, 2020 | 9:25 AM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील तपासाला वेग आल्याचे दिसत आहे. सुशांतच्या वांद्र्यातील घरी स्पॉट चौकशीसाठी पाटणा पोलीस जाण्याची शक्यता आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत सुशांतच्या बहिणीचं भांडण झालं होतं, अशी माहिती समोर येत आहे. (Sushant Singh Rajput Suicide Case Girlfriend Rhea Chakraborty allegedly fought with his sister)

सुशांतचा नोकर दीपेश मिरिंडा आणि गार्ड यांची काल चौकशी झाली होती. दीपेशकडून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती आहे. सुशांतचा मित्र परिवार आणि बहिणीचाही पाटणा पोलीस जबाब घेणार आहेत. याचं कारण म्हणजे रिया चक्रवर्तीसोबत सुशांतच्या बहिणीचं भांडण झालं होतं, अशी माहिती जबाबातून समोर आली आहे.

दरम्यान, रियाची चौकशी करण्यासाठी पाटणा महिला पोलिसांचं पथक मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाटणा एसएसपी उपेंद्र कुमार शर्मा मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहेत. पाटणा पोलीस रियाच्या कुटुंबियांचीही चौकशी करणार आहेत.

हेही वाचा : रियाने सुशांतला खूप त्रास दिला, अंकिता लोखंडेचा धक्कादायक जबाब, व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा दाखला

याआधीच रियाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत केस बिहारहून मुंबईत ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे. तर सुशांतच्या वडिलांनी रियाच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेविरोधात अर्ज केला आहे. रियाच्या वकिलांकडून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आधीपासूनच शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सलमान खान, संजय दत्त यांच्यासारख्या कलाकारांची बाजू लढवणारे ख्यातनाम वकील सतीश मानेशिंदे यांनी रियाचे वकीलपत्र घेतले आहे.

अंकिता लोखंडेचा धक्कादायक जबाब

सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची, याबाबत सुशांतने स्वत: आपल्याला सांगितलं होतं, असं अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने बिहार पोलिसांना सांगितलं. बिहारच्या पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतचे वडील के. के. सिंह यांच्या तक्रारीनंतर रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुशांतने आपल्याला फोन केला होता. यावेळी त्याने माझं अभिनंदन केलं. त्यानंतर तो रियाबद्दल बोलत होता. रिया मला खूप त्रास देते. तिच्यासोबत रिलेशनमध्ये मला रहायचं नाही. मला तिच्यापासून दूर व्हायचं आहे. मला काही सुचत नाही, असं सुशांतच म्हणणं होतं”, अशी माहिती अंकिताने पोलिसांना दिली.

संबंधित बातम्या :

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस मुंबईत, रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत

Rhea Chakraborty | सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात ट्विस्ट, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.