Sushant Singh Death Case | आधी ड्रग्ज अँगल, आता बक्कळ पुरावे, सुशांत प्रकरणी सीबीआय रियाला अटक करण्याची शक्यता

सुशांतची मैत्रीण आणि सीबीआयच्या रडारवर असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक होण्याची शक्यता (Sushant Singh Rajput Suicide CBI investigation 6 th day) आहे.

Sushant Singh Death Case | आधी ड्रग्ज अँगल, आता बक्कळ पुरावे, सुशांत प्रकरणी सीबीआय रियाला अटक करण्याची शक्यता
या दरम्यान, सुशांतच्या कुटुंबियांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. सध्या सीबीआय संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून यामध्ये आणखी धक्कादायक खुलासे समोर येणार असल्याचं बोललं जातं आहे.
Follow us
| Updated on: Aug 26, 2020 | 1:24 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला दररोज धक्कादायक वळणं मिळत आहेत. सीबीआय चौैकशीचा आज सहावा दिवस आहे. सीबीआयची टीम सलग सहा दिवस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुशांतची मैत्रीण आणि सीबीआयच्या रडारवर असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी रिया ही सीबीआयच्या ताब्यात असू शकते, अशी माहिती समोर येत आहे. (Sushant Singh Rajput Suicide CBI investigation 6 th day)

रिया चक्रवर्तीला अटक करण्याएवढे पुरावे सीबीआयजवळ मिळाले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून सीबीआय सुशांतच्या आत्महत्येचा तपास करत आहेत. मात्र अद्याप रियाची चौकशी करण्यात आलेली नाही. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार रियाला सीबीआयकडून अटक होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

जया सहाची ईडी चौकशी 

ईडीकडून आज जया सहा यांची चौकशीसाठी समन्स पाठवण्यात येणार आहे. जया सहा श्रुती मोदीच्या टीममध्ये काम करत होती. जया सहा याचे नाव हे ड्रग्सच्या कथित व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आहेत. दरम्यान सुशांतच्या अकाऊंटमधून लाखो रुपये kwan टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आले आहेत. तर या कंपनीच्या अकाऊंटमधून लाखो रुपये रिया आणि शौविकच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले गेलेत. जया सहा ही kwan टॅलेंट मॅनेजमेंटची व्यवस्थापकीय सल्लागार आहेत.

रियाच्या कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये ‘ड्रग्ज अँगल’ समोर

रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवरुन पाठवलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज समोर आले आहेत. ज्यामध्ये रियाने एमडीएमए, गांजा अशा ड्रग्जचा उल्लेख केल्याचे दिसते. जया सहा नावाच्या व्यक्तीने रियाला “चहा किंवा पाण्यात 4 थेंब वापर आणि त्याला पिऊ दे… किक बसायला 30-40 मिनिटे दे” असे मेसेज केले आहेत.

एका कथित चॅटमध्ये रिया ही गौरव आयरा नावाच्या संशयित ड्रग्ज विक्रेत्याशी बोलत आहे. ती म्हणते, “हार्ड ड्रग्जबद्दल बोलायचं तर मी जास्त घेतलेले नाहीत. एकदा एमडीएमए घेण्याचा प्रयत्न केला” या मेसेजनंतर “आपल्याकडे एमडी आहे का?” अशी विचारणा रियाने केली. 8 मार्च 2017 रोजी तिने हा मेसेज केला होता.

दुसर्‍या संभाषणात, रियाच्या फोनमध्ये ‘मिरांडा सुशी’ म्हणून सेव्ह केलेल्या नंबरवरुन (सुशांतचा मदतनीस सॅम्युअल मिरांडा) रियाला मेसेज आला आहे “हाय रिया, स्टफ (माल) जवळजवळ संपला आहे.” त्यानंतर मिरांडा रियाला विचारतो “शोविकच्या (रियाचा भाऊ) मित्राकडून आपण ते घ्यायला पाहिजे का? पण त्याच्याकडे नुसतेच हॅश अँड बड (कमी प्रतीचे ड्रग्ज) आहे.”

रियाने ड्रग्सचे सेवन केलेले नाही, वकिलांचा दावा

दरम्यान, रियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. ती रक्त तपासणीसाठी तयार आहे, असे उत्तर रियाच्या वकिलांनी दिले आहे. मृत्यू प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ उघडकीस आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) या प्रकरणात चौकशी सुरु करण्याची शक्यता आहे.

कूपर आणि मुंबई पोलिसांना कारणे दाखवा

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला शवगृहात प्रवेश दिल्याबद्दल कूपर रुग्णालय आणि मुंबई पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सुशांतच्या पोस्टमार्टमच्या वेळी रुग्णालयात रिया चक्रवर्ती उपस्थित असल्याची व्हिडीओ क्लिप समोर आली. त्यानंतर परवानगीचा प्रश्न उपस्थित करत मुंबई पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाने मंगळवारी कारणे दाखवा नोटीस दिली. (Sushant Singh Rajput Suicide CBI investigation 6 th day)

संबंधित बातम्या : 

रुग्णवाहिका चालकाला चार वेळा फोन, निर्माता संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर

रियाकडून सुशांतवर आध्यात्मिक उपचार, सीबीआय पंडित, पुजारी तांत्रिक-मांत्रिकांचीही बाजू तपासणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.