Sushant Singh Suicide | सुशांत सिंह राजपूतला डिप्रेशनमध्ये कुणी ढकललं? आतापर्यंत 30 जणांचे जबाब

अभिनेता सुशांत सिंहने आत्महत्या करुन 23 दिवस उलटल्यानंतरही त्याचा तपास सुरुच (Sushant Singh Suicide Case Police Inquiry) आहे.

Sushant Singh Suicide | सुशांत सिंह राजपूतला डिप्रेशनमध्ये कुणी ढकललं? आतापर्यंत 30 जणांचे जबाब
Follow us
| Updated on: Jul 03, 2020 | 8:40 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत कोणत्या कारणामुळे डिप्रेशनमध्ये (Sushant Singh Suicide Case Police Inquiry) होता. त्यामागे कोण होतं. याचा तपास पोलिसांकडून आता सुरू झाला आहे. सुशांतच्या डिप्रेशन मागे कोणता व्यक्ती होता, हे स्पष्ट झाल्यावर पोलिसांना त्यांच्या आत्महत्येस कोण जबाबदार आहे हे ठरवता येणार आहे. यानंतर त्या अनुषंगाने कारवाई होणार आहे.

अभिनेता सुशांत सिंहने आत्महत्या करुन 23 दिवस उलटले आहे. मात्र यानंतर ही त्याचा तपास सुरुच आहे. आतापर्यंत 30 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एवढा तपास झाल्यानंतरही सध्या आत्महत्येबाबत एडीआर दाखल आहे. हा खुनाचा प्रकार नाही.

यामुळे मग सुशांत याच्या आत्महत्येस कोण जबाबदार आहे का, याचा आता पोलीस शोध घेत आहेत. तसं आढळल्यास या एडीआरच्या गुन्ह्यात बदल करून आत्महत्येस कारणीभूत ठरल्याबाबतचा गुन्हा दाखल केला जाईल. सुशांत याच्या आत्महत्येस कुणी जबाबदार आहे का? कोणी सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं? हे तपास अधिकारी शोधत आहेत.

हेही वाचा – Sushant Singh Suicide | दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही चौकशीला बोलावलं

सुशांत याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामुळे त्याला अनेक चित्रपट मिळाले होते. मात्र, त्यापैकी काही चित्रपट काढून घेण्यात आले. एकच नाही तर अनेक फिल्म बनवणाऱ्या प्रोडक्शन हाऊसने त्याला चित्रपटातून बाहेर काढलं होतं. सुशांतच खच्चीकरण करण्याचे वेगवेगळे प्रकार सुरू होते. यामुळे सुशांत डिप्रेशनमध्ये गेला होता. तो मनोविकार तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचार घेत होता.

सुशांतच्या विरोधात खालील गोष्टी घडत होत्या?

1) त्याचे चित्रपट काढून घेणं. 2) त्याला नवीन चित्रपट मिळू न देणे 3)त्याच्या विरोधात मीडिया, सोशल मीडिया यावर बातम्या छापून येणे

या कारणास्तव सुशांत डिस्टर्ब होता. त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता. पोलीस याच मुद्द्यावर तपास करत आहेत. सुशांतचे चित्रपट कोणी आणि कसे काढून घेतले, या अनुषंगाने पोलिसांनी साक्षीदार गोळा करायला सुरुवात केली आहे.

यावेळी पोलिसांनी फिल्म इंडस्ट्रीतील दिग्दर्शक शेखर कपूर आणि संजय लीला भन्साळी यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. या दोघांच्या जबाबातून सुशांतला डिप्रेशन मध्ये ढकलणाऱ्या व्यक्तीची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. एकदा का हे स्पष्ट झाल्यास पोलिसांना गुन्ह्याचे स्वरूप बदलायला सोपं जाणार (Sushant Singh Suicide Case Police Inquiry) आहे.

संबंधित बातम्या : 

Bollywood Celebrities | 2020 च्या सहा महिन्यात मनोरंजन विश्वाने गमावले 20 हिरे!

Sushant Singh Suicide Investigation | अभिनेत्री संजना संघीची 9 तास चौकशी, ‘मी टू’च्या कथित आरोपांवर प्रश्न

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.