मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्करला (Swara Bhaskar) सध्या सोशल मीडियावर (social media) काही लोकं ट्रोल करत आहेत. तिच्या लग्नाला काही महिने झाले असून ती आई झाली आहे, असा दावा काही युजर्स करत आहे. एका न्यूज चॅनेलचे बनावट स्क्रीनशॉट शेअर करून असा दावा करण्यात आला आहे की स्वरा आई (pregnancy) झाली आहे. आता सोशल मीडियावर काही युजर्स तिला ट्रोल करून आई झाल्याबद्दल तिचे अभिनंदन करत आहेत.
अभिनेत्री स्वरा भास्करने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात फहद अहमद याच्याशी लग्न केले. त्या दोघांनी आधी कोर्ट मॅरेज केले आणि नंतर दिल्ली येथे पारंपारिक पद्धतीने लग्न केले होते.
सध्या स्वराच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वराच्या लग्नाला साडेचार महिने पूर्ण झाले आणि तिने बाळाला जन्म दिलाय, अशी अनेक ट्विट्स सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहेत. तर काही ट्विट्समध्ये असेही म्हटले जात आहे की स्वराच्या पतीने तिच्या प्रेग्नन्सीचे वृत्त कन्फर्म केले असून ती जुलै महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. मात्र या वृत्ताबाबत स्वरा भास्कर किंवा फहाद कडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान स्वराने कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि कलाकारांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.