Swara Bhasker चे X अकाऊंट कायमचे सस्पेंड, महात्मा गांधींवर पोस्ट केल्याने झाली कारवाई?
अभिनेत्री स्वरा भास्कर हीचे एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट कायमचे सस्पेंड केले गेले आहे. अभिनेत्री स्वरा हीने स्वतः आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. स्वरा भास्कर याबद्दल प्रचंड संतापली आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री स्वरा भास्कर हीचे एक्स अकाऊंट ( आधीचे ट्वीटर ) कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हीने स्वत:च इंस्टाग्रामवर पोस्ट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. स्वरा या कारवाई नंतर खूपच नाराज झाली आहे. स्वरा भास्कर हिने सांगितले की त्या दोन वेगवेगळ्या पोस्ट वर कॉपीराईटचे उल्लंघन केल्याची वॉर्निंग आली होती. त्यानंतर तिचे एक्स अकाऊंट कायम स्वरुपी बंद करण्यात आले आहे.
स्वराचे अकाऊंट झाले सस्पेन्ड
आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये स्वरा भास्कर हीने तिची ३० जानेवारी आणि २६ जानेवारी रोजी शेअर केलेली पोस्ट टाकली आहे. तसेच एक्स कडून आलेला कॉपीराईट भंगाचा आलेला मॅसेज देखील तिने शेअर केला आहे.या इंस्टाग्रामच्या पोस्टवरील कॅप्शन लिहिताना म्हटले की, ” तुम्ही हे सर्व उगाचत नाही सांगू शकत, डिअर एक्स मेरे दो ट्वीटमधील दोन फोटोंना कॉपीराईटचे उल्लंघनाचा मार्क केला आहे. मी माझ्या अकाऊंटना खोलू नाही शकत आणि तुमच्या टीमच्या वतीने यांना कायमस्वरुपी सस्पेंड केले आहे.”
स्वरा पुढे लिहितात की,’ एका फोटोत ऑरेंज बॅकग्राऊंड होती. आणि हिंदी देवनागिरीत लिहीले होते की गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातिल अभी जिंदा है, हा भारतातील प्रगतीशील आंदोलनाचा नारा आहे.या कोणतीही कॉपीराईट उल्लंघनाची बाब नाही.दुसरा फोटो माझ्या स्वत:च्या मुलीचा फोटो आहे. त्यात तिचा चेहरा लपवला आहे.ती भारताचा झेंडा फडकवत आहे.त्यात लिहीलेय की प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. यात काय कॉपीराईट उल्लंघनाची काय बाब आहे? कोणाजवळ माझ्या मुलाला पसंद करण्याचा कॉपीराईट हक्क आहे.?’




आपली नाराजगी सांगतातना त्या पुढे लिहीतात की, ‘या दोन्ही तक्रारी कॉपीराईटच्या कोणत्याही कायदेशीर परिभाषेत कोणत्याही तर्कसंगत, तार्कीक आणि उद्देश्यपूर्ण समजण्या पलिकडचा आहे. जर या दोन्ही पोस्टना मास रिपोर्ट केले गेले आहे तर युजर म्हणजे मला हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.यात माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृपया यात लक्ष घाला आणि आपला निर्णय बदला. धन्यवाद , स्वरा भास्कर.’
स्वरा भास्कर आपल्या स्पष्टवक्ते पणा बद्दल प्रसिद्ध आहेत, अभिनेत्री खूप काळापासून राजकीय विषयावरील आपली मते मोकळेपणे मांडत आल्या आहेत. त्यांनी अनेकदा सरकार विरोधी निदर्शनात सहभाग घेतला आहे. स्वराने फेब्रुवारी २०२३ मध्ये समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याशी विवाह केला आहे, दोघांना एक मुलगी आहे.