‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील युवा अभिनेत्याचे अकाली निधन
झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' अब्दुला दळवी ही व्यक्तिरेखा साकारलेला अभिनेता प्रशांत लोखंडे याचे निधन झाले
मुंबई : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘स्वराज्यरजननी जिजामाता’ यासारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारणारा युवा अभिनेता प्रशांत लोखंडे याचे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रशांतची प्राणज्योत मालवली. प्रशांतच्या निधनाने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Swarajya rakshak Sambhaji Serial Fame Marathi Actor Prashant Lokhande Dies)
झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ प्रशांत लोखंडे याने अब्दुला दळवी ही व्यक्तिरेखा साकारली होती. अब्दुला दळवी यांच्या तोंडी असलेला ‘बाद में कटकट नको’ हा संवाद चांगलाच लोकप्रिय झाला होता.
प्रशांतने सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत बाजी घोरपडे ही भूमिका साकारली होती. तर स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ या गाजलेल्या मालिकेमध्येही त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.
प्रशांतने आपल्या फेसबुक पेजवर कलर्स मराठी वाहिनीवरील आगामी ‘शुभमंगल ONLINE’ या मालिकेचाही प्रोमो काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. त्यामुळे प्रशांत या मालिकेतही झळकणार होता, असे दिसते.
‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांची निर्मिती करणाऱ्या ‘जगदंब क्रिएशन्स’च्या सोशल मीडियावरुन प्रशांतच्या निधनाची दुःखद बातमी शेअर करण्यात आली आहे.
प्रशांत लोखंडे याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची माहिती आहे. 14 सप्टेंबरला रात्री त्याने अखेरचा श्वास घेतला. ऐन उमेदीत तरुण अभिनेत्याची एक्झिट त्याच्या चाहत्यांनाही चटका लावून जाणारी आहे. (Swarajya rakshak Sambhaji Serial Fame Marathi Actor Prashant Lokhande Dies)
अभिनेता सिद्धार्थ जाधव यानेही प्रशांतच्या निधनाने धक्का बसल्याचे लिहिले आहे.
प्रशांत लोखंडे … खुपच धक्कादायक बातमी… intercollegiate एकांकिकापासून स्पर्धेपासून पाहतोय.. मेहनती, हरहुन्नरी कलाकार… मित्रा… अजूनही विश्वास बसत नाहीय… भावपूर्ण श्रद्धांजली??? pic.twitter.com/9dsj3mD2dB
— SIDDHARTH JADHAV ?? (@SIDDHARTH23OCT) September 14, 2020
(Swarajya rakshak Sambhaji Serial Fame Marathi Actor Prashant Lokhande Dies)