सुशांतसिंह राजपूत जिवंत असता, तर तुरुंगात असता का? : तापसी पन्नू

जर सुशांत जिवंत असता तर तो तुरुंगात असता? अरे नाही! त्याला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली असेल, असं तापसीने लिहिलं आहे.

सुशांतसिंह राजपूत जिवंत असता, तर तुरुंगात असता का? : तापसी पन्नू
Follow us
| Updated on: Sep 09, 2020 | 10:49 AM

मुंबई : आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर पुन्हा खळबळ उडवून देणारं ट्वीट केलं आहे. “अभिनेता सुशांतसिंह राजपूत जर जिवंत असता, तर तोही तुरुंगात असता का?” असा सवाल तापसीने ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने उपस्थित केला. (Taapse Pannu asks if Sushant Singh Rajput was alive he would’ve been put behind bars too)

रियाच्या समर्थनात उतरलेल्या बॉलिवूडच्या फळीमध्ये तापसी पन्नूचाही समावेश आहे. रियाने ड्रग्ज घेतल्याचा उल्लेख एनसीबीच्या रेकॉर्डवर नसल्याच्या बातमीचे ट्वीट ‘कोट’ करुन तपासीने आपले मत मांडले आहे. “करेक्शन. ती (ड्रग्जचे) सेवन करत नव्हती. सुशांतसाठी फायनान्सिंग (पुरवठा) करत होती. म्हणजे, जर सुशांत जिवंत असता तर तो तुरुंगात असता? अरे नाही! त्याला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली असेल. सुशांतला जबरदस्ती गांजा दिला गेला असेल. होय… हेच आहे. आपण करुन दाखवलं’ असं तापसीने लिहिलं आहे.

तापसीने ट्वीट केल्यानंतर काही काळ ती ट्विटरवर ट्रेंडमध्ये आली. मात्र सुशांतच्या चाहत्यांना तिचे मत न रुचल्याने ते सोशल मीडियावरुन तिच्यावर तुटून पडले.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना ड्रग्ज कनेक्शन सापडल्यानंतर चौकशी दरम्यान ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक केली. रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तिची रवानगी आज भायखळा तुरुंगात होणार आहे.

रियाला काल (मंगळवार 8 सप्टेंबर) दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी एनसीबीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत तिचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. एनसीबीकडून सलग तीन दिवस रियाची चौकशी सुरु होती. तीन दिवस मिळून जवळपास 15 तास चौकशी करण्यात आली.

रियाचा मुक्काम मंगळवारच्या रात्री NCB कार्यालयात झाला. एनसीबी कार्यालयाचे गेट रात्रभर बंद ठेवण्यात आले होते, तर बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तुरुंगाच्या नियम पुस्तकानुसार संध्याकाळी तुरुंगातील कैद्यांची मोजणी झाल्यानंतर नवीन कैदी घेतले जात नाहीत. त्यामुळे रियाला संपूर्ण रात्र एनसीबी कार्यालयात ठेवण्यात आले. आज सकाळी तिला भायखळाला तुरुंगात नेले जाईल.

संबंधित बातमी :

अटकेनंतर रियाचा मुक्काम एनसीबी कार्यालयात, भायखळा तुरुंगात रवानगी होणार

(Taapse Pannu asks if Sushant Singh Rajput was alive he would’ve been put behind bars too)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.