मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा…’ कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. टीआरपी यादीमध्ये देखील मालिका अव्वल स्थानी असते. मालिकेतील गोकूळ धाम सोसायटीमधील सर्वांची एकता आणि टप्पू सेना यांच्या मस्तीमुळे मालिकेने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. मालिकेतील सर्वात आवडती भूमिका म्हणजे टप्पू… सोसायटीमध्ये कायम कल्ला करणारा जुना टप्पू आता मोठा झाला आहे… पण जुन्या टप्पूला आजही चाहते विसरू शकले नाहीत… ‘तारक मेहता का उल्टा चष्मा…’ मालिकेत टप्पूच्या भूमिकेत झळकलेला टप्पू म्हणजे अभिनेता भव्य गांधी आता फार मोठी झाला आहे. भव्य गांधी आता मालिकेत दिसत नसला तरी, चाहत्यांमध्ये अभिनेता कायम चर्चेत असतो…
पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा…’ मालिकेतील जुन्या टप्पूला ओळखणं देखील आता कठीण झालं आहे. भव्य याच्या लूकमध्ये फार मोठे बदल झाले आहेत. भव्य गांधी आता २५ वर्षांचा झाला आहे. भव्य आता त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम व्यस्त असतो. भव्य याने फार वर्षांपूर्वी मालिकेचा निरोप घेतला..
अनेक वर्षांनंतर टप्पूला पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल… अभिनेत्याचं बदललेला लूक पाहून तुम्हीही गोंधळून जाल. टप्पूची भूमिका साकारणारा भव्य गांधी सोशल मीडियावर कायम असतो. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेता चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो…
आता देखील भव्य गांधी यांनी सोशस मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. भव्यच्या फोटोवर अनेक चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.. एक नेटकरी अभिनेत्याच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘आमच्या लहानपणीचा हिरो आता मोठा झाला आहे…’, तर दुसरा युजर म्हणाला, ‘भाऊ, जिममध्ये जा.. तू कोणत्याच बाजूने अभिनेता दिसत नाहीस…’
आणखी एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘माफी मागतो.. पण तू 25 वर्षांचा असून तू 30 वर्षांचा दिसत आहेस…’ सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.. भव्य गांधी याच्याबद्दल सांगायचं झालं तर, शिक्षणासाठी अभिनेत्याने मालिकेचा निरोप घेतला… गेल्या काही वर्षांपासून भव्य रिजनल सिनेमांमध्ये काम करत होता.. डॉक्टर डॉक्टर नावाच्या हिंदी सिनेमाचा देखील भव्य भाग आहे, ज्यावर सध्या काम सुरू आहे.