‘तारक मेहता’मधील या अभिनेत्रीचा झाला अपघात, पोस्ट शेअर करून घडलेल्या दुर्घटनेची सांगितली माहिती…
बबीता हे पात्र मुनमून दत्ता ही अभिनेत्री साकारते आहे. हीच मुनमून सध्या जर्मनी दौऱ्यावर आहे, मात्र तिचा अपघात झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
नवी दिल्लीः तारक मेहता का उल्टा चष्मा ही कौटुंबीक मालिका सर्वांची आवडती मालिका आहे. या मालिकेत दिसणारी गोकुळधाम सोसायटी आणि त्यामध्ये दिसणारी पात्रं ही चाहत्यांनाही प्रचंड आवडणारी आहेत, त्यापैकीच एक आहे ती म्हणजे बबीता. बबीता हे पात्र मुनमून दत्ता ही अभिनेत्री साकारते आहे. हीच मुनमून सध्या जर्मनी दौऱ्यावर आहे, मात्र तिचा अपघात झाल्याचेही सांगण्यात येत आहे. अभिनेत्री मुनमून दत्ता सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर असतानाच तिचा अपघात झाल्याचे तिने स्वतः इन्स्टाग्रामवरुन या अपघाताची माहिती तिने आपल्या चाहत्यांना दिली आहे.
आठवड्याभरापूर्वी मुनमून दत्ता युरोप ट्रीपवर गेली आहे. ती ट्रीपवर असतानच तिने स्वित्झर्लंड आणि जर्मनीलाही तिने भेट दिली आहे, मात्र या ट्रीपवर असतानाच तिचा अपघात झाल्याचे तिने सांगितले आहे.
इन्स्टाग्रामवरुन तिने अपघाताची माहिती देताना तिने सांगितले आहे की, माझा जर्मनीमध्ये एक छोटासा अपघात झाला आहे. त्या अपघातामुळे माझा डावा गुडघा दुखत असल्याचेही तिने सांगितले आहे.
अपघातातील या दुःखीमुळे मी माझा प्रवास मध्येच थांबवून आता घरी परतणार असल्याचेही सांगण्यात आले. या पोस्टमध्ये तिने तुटलेल्या हृदयाची इमोजीही टाकली आहे. या अपघातामुळे तिचा प्रवास अर्धवट राहिल्याने ती नाराज असल्याचेच या पोस्टमधून दिसत आहे.
मुनमून दत्तान जर्मनीपूर्वी स्वित्झर्लंडमध्ये थांबलेली होती. तर दोन दिवसांपूर्वी मुनमून स्वित्झर्लंडमधील इंटरलेकने ती जर्मनीला गेली होती. ती ज्यांच्याकडे थांबली होती.
त्या घरातील जेवणाचे फोटोही तिने शेअर केले होते. यासोबतच तिने तेथील चॉकलेटचाही आस्वाद घेतला असल्याचे दिसून येत आहे.
मुनमून दत्ता गेल्या अनेक वर्षांपासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कॉमेडी शोचा भाग आहे. तिची बबिता ही भूमिका लोकांना प्रचंड आवडली आहे.