Marathi Serial : ठाण्यातील तलावपाळी परिसर आकर्षक रोषणाईने उजळला, महाराष्ट्र पोलिसांना सलाम

महाराष्ट्र पोलिसांचं चातुर्य आणि साहसाची गोष्ट सांगणारी ‘नवे लक्ष्य’ ही मालिका नुकतंच सुरु झाली आहे. पोलिसांच्या कार्याला समर्पित असणाऱ्या या मालिकेच्या निमित्तानं ठाणे तलावपाली परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करुन स्टार प्रवाह वाहिनीच्या वतीनं महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा देण्यात आला. (Talaopali area in Thane lit up with attractive lighting, salute to Maharashtra Police)

Marathi Serial : ठाण्यातील तलावपाळी परिसर आकर्षक रोषणाईने उजळला, महाराष्ट्र पोलिसांना सलाम
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 1:18 PM

मुंबई : महाराष्ट्र पोलिसांचं चातुर्य आणि साहसाची गोष्ट सांगणारी ‘नवे लक्ष्य’ ही मालिका नुकतंच सुरु झाली आहे. पोलिसांच्या कार्याला समर्पित असणाऱ्या या मालिकेच्या निमित्तानं ठाणे तलावपाली परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करुन स्टार प्रवाह वाहिनीच्या वतीनं महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा देण्यात आला. (Talaopali area in Thane lit up with attractive lighting, salute to Maharashtra Police)

‘या’ मान्यवरांची उपस्थिती

Nave Laksha

याप्रसंगी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, खासदार राजन विचारे, स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे, निर्माते आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर आणि नवे लक्ष्य मालिकेची सर्व कलाकार मंडळी हजर होते.

ठाणेकरांनी लुटला आनंद

Nave Laksha

ठाणेकरांसाठी तलावपाली म्हणजे फिरण्याचं आवडतं ठिकाण. नवे लक्ष्य मालिकेच्या निमित्ताने करण्यात आलेल्या आकर्षण विद्युत रोषणाईचा झगमगाट ठाणेकरांनी नुकताच अनुभवला. नौकाविहार करताना मालिकेची झलक पाहाण्याचा सुखद अनुभव देखील प्रेक्षकांना घेता आला.

पोलिसांना मानाचा मुजरा

Nave Laksha

महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे. पोलीसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्‍या गुन्ह्याची रोमांचक रीतीने उकल करून सांगणारी ही कथामालिका आहे.

सतीश राजवाडे यांची प्रतिक्रिया

‘नवे लक्ष्य’ या कार्यक्रमाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपले कर्तव्यदक्ष पोलीस आणि त्यांच्या डिपार्टमेंटची गोष्ट सांगताना आम्हाला अभिमान वाटतोय. काय कस लागतो, काय हुशारी लागते आणि कसे तुम्हाला सतर्क रहाण्यास मदत होईल हे या नवे लक्ष्यमधून उलगडेल. ही मालिका पहाताना आपल्या पाठीशी भावा-बहिणीप्रमाणे खंबीरपणे आपलं महाराष्ट्र पोलिसांचं डिपार्टमेण्ट उभं आहे याची जाणीव होईल.’

आदेश बांदेकर यांची निर्मिती

स्टार प्रवाह प्रस्तुत नवे लक्ष्य या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. या मालिकेबद्दल सांगताना निर्माते आदेश बांदेकर म्हणाले, ‘नवे लक्ष्य नव्या रुपामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर येत आहे याचा आनंद आहे. पोलीस दलाविषयी आपल्या सगळ्यांनाच आदर आणि अभिमान आहे. महाराष्ट्र पोलिसांचं कौशल्य, चातुर्य आणि त्यांची कर्तव्यतत्परता वाखाणण्याजोगी आहे. वर्दीच्या आतला माणुस आणि त्याचं माणुसपण अधोरेखित करणारं असं हे नवे लक्ष्य आहे. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याची गोष्ट आपण सहकुटुंब पाहायलाच हवी.

संबंधित बातम्या

RRR | राजामौलींच्या ‘आरआरआर’मध्ये अशी दिसणार आलियाने साकारलेली ‘सीता’, पाहा तिचा खास लूक…

Video | ‘जेव्हा मी काडीपैलवान होते आणि नाचण्याचा प्रयत्न करायचे…’, प्राजक्ता माळीने शेअर केला बालपणीचा व्हिडीओ!

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.