Raveena Tandon: रवीनालाही करावा लागला होता ‘या’ गोष्टीचा सामना; सर्वसामान्य मुलीसारखाचा तिलाही चुकला नाही संघर्ष
रवीनाने लिहिले की, "लहान असताना मीही कधीतरी लोकल ट्रेन आणि बसनेही प्रवास केला आहे. अनेक वेळा माझा विनयभंगही झाला आहे,अनेकदा मला चिमटा काढण्यात आला आहे, माझ्यासोबतही असे सर्व काही घडले आहे.
मुंबईः अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) अलीकडेच एक खुलासा केला आहे की किशोरवयीन वयात असताना मुंबईच्या लोकल बसमधून जात असताना तिचा विनयभंग झाला होता. सोशल मीडियावर ट्रोल (Trolls) करणाऱ्याना उत्तर देताना रवीनाने सांगितले की, इतकेच नाही तर रवीनासुद्धा आपणही एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय मुलीप्रमाणेच संघर्ष केला आहे आणि माझं शारीरिक शोषणही (Physical abuse) झालं आहे. रवीना टंडन यांनी आता महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या मेट्रो 3 कारशेडचे आरे परिसरात स्थलांतर करण्याच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले.
Teen yrs,travelled in locals/buses,got eveteased,pinched,everything that most women go through,earned my first car in 92.Development is welcome,we have to b responsible,not only a project,but wherever we are cutting thru r forests,to safeguard environment/wildlife. @SunainaHoley https://t.co/Wwxk5IDzJU
— Raveena Tandon (@TandonRaveena) July 2, 2022
रवीना ते दिया मिर्झा यांसारखे सेलिब्रिटीनी आरे परिसरातील जंगल तोडून तेथे आरे मेट्रो ३ कारशेड बांधण्याचला विरोध दर्शविला आहे. मुंबई लोकल बसमध्येही माझा विनयभंग झाला होता असं सांगितले.
अनेक वेळा माझाही विनयभंग झाला
या प्रकरणावर एका यूजरने रवीना आणि दियासह अनेक सेलिब्रिटींना टॅग केले आणि लिहिले की त्यांना मुंबईतील मध्यमवर्गीय लोकांच्या संघर्षाबद्दल काही माहिती आहे की नाही. याला उत्तर देताना रवीनाने लिहिले की, “लहान असताना मीही कधीतरी लोकल ट्रेन आणि बसनेही प्रवास केला आहे. अनेक वेळा माझा विनयभंगही झाला आहे,अनेकदा मला चिमटा काढण्यात आला आहे, माझ्यासोबतही असे सर्व काही घडले आहे. अशा अनेक मुलींना जो त्रास होतो, त्याच जाचातून मला जावं लागलं आहे.
शहरात होणाऱ्या विकासाचे स्वागतच
मी खरेदी केली आहे. करीना सांगते की, मी 1992 साली माझी पहिली कार खरेदी केली. शहरात होणाऱ्या विकासाचे स्वागतच आहे. पण, केवळ एका प्रकल्पासाठी आपण जबाबदार नाही, तर आपण पर्यावरण आणि वन्यजीव, तोडल्या जाणार्या जंगलांचे आपण संरक्षण केले पाहिजे आणि या सगळ्यासाठी आपण जबाबदारीनेही वागले पाहिजे असंही तिने सांगितले आहे.
ट्रोलर्सकडून शारीरिक शोषण
लोकल ट्रेनचा व्हिडीओ शेअर करताना दुसऱ्या युजरने रवीनाला टॅग करून विचारले आहे की, तू असा प्रवास शेवटचा कधी केला होता? यावर रवीनाने उत्तर दिले की, 1991 पर्यंत मी ट्रेन आणि बसमधून सर्वसामान्यांप्रमाणेच मी प्रवास केला आहे आणि एक मुलगी म्हणून मला तुमच्यासारख्या अज्ञात ट्रोलर्सकडून शारीरिक शोषणाचा सामना करावा लागला आहे.
तुमच्याकडेही कार आणि घर असेल
याशिवाय दुसर्या ट्रोलरला उत्तर देताना रवीनाने लिहिले की, “प्रत्येकाचे आयुष्य गुलाबाच्या बिछान्यासारखे गुलाबीच असते असे नसते. प्रत्येकाचा स्वतःचा एक संघर्ष असतो. मला मनापासून आशा आहे की तुमच्याकडेही कार आणि घर असेल.कधी तरी पूर, नैसर्गिक आपत्ती काहीही आलं तरी त्यामध्ये सगळ्यात आधी सामान्य माणसावर त्याचा परिणाम होईल आणि श्रीमंत लोक सर्व काही सोडून पळून जातील असंही तिने म्हटले आहे.