Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या लेखकाची आत्महत्या, कुटुंबियांना वेगळाच संशय

लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे लेखक अभिषेक मकवाना (Writer Abhishek Makwana) यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली.

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या लेखकाची आत्महत्या, कुटुंबियांना वेगळाच संशय
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 5:47 PM

मुंबई : लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे लेखक अभिषेक मकवाना (Writer Abhishek Makwana) यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. मात्र, आता ऑनलाइन फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगमुळे लेखक अभिषेक वर्मा यांनी हे पाऊल उचलले असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. इतकेच नाही तर कित्येक दिवसांपासून त्यांना धमकीचे कॉल येत असल्याचा दावाही त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे (Tarak Mehta Ka ooltah Chashmah fame writer Abhishek Makwana suicide family claims of black mailing).

अभिषेकने घेतलेल्या कर्जाची रक्कम न भरल्याबद्दल बदल्यात कुटुंबाला धमकावले जात होते. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, 27 नोव्हेंबरला अभिषेक त्याच्या मुंबई स्थित फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिट्ठी देखील लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूचे कारण आर्थिक तंगी असल्याचे स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन फसवणूकीचा बळी ठरला अभिषेक?

अभिषेकचा भाऊ जेनिस याने माध्यमांना या संदर्भात प्रतिक्रिया दिली. जेनिस म्हणाला की, ‘अभिषेकच्या मृत्यूनंतरच्या त्यांच्या त्रासाबद्दल मला माहिती मिळाली. त्याच्या मृत्यूनंतर मला धमकीचे फोन येऊ लागले, तेव्हा त्याला होणारा त्रास जाणवला.’ जेनिस म्हणाले की, यानंतर मी माझ्या भावाचे मेल तपासले. कारण, त्याचे निधन झाल्यामुळे थकीत कर्जाची भरपाई करण्यासाठी मला वेगवेगळ्या क्रमांकांवरून अनेक फोन आले.

पुढे ते म्हणाले की, ‘या क्रमांकांपैकी एक बांगलादेशातील कॉल होता. तर, एक म्यानमारमध्ये आणि इतर भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतील फोन क्रमांक होते. मला अभिषेकच्या ईमेल रेकॉर्डवरून समजले की, माझ्या भावाने ‘इझी लोन अ‍ॅप’कडून एक लहानसे कर्ज घेतले होते, ज्याचा व्याज दर खूप जास्त होता.’ (Tarak Mehta Ka ooltah Chashmah fame writer Abhishek Makwana suicide family claims of black mailing)

‘यानंतर मी, अभिषेक आणि अ‍ॅपमधील अनेक व्यवहार तपासले. त्यात मला असे आढळले की, माझा भाऊ कोणत्याही कर्जासाठी स्वतःहून अर्ज करत नसतानाही ते लोक त्याच्या खात्यावर सतत छोट्या छोट्या रकमा पाठवत होते. ज्यांचा व्याज दर सुमारे 30 टक्क्यांपर्यंत होता’, असे जेनिस म्हणाले.

पोलिसांत तक्रार दाखल

या कर्ज देणाऱ्या अ‍ॅप विरोधात कुटुंबाने चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ‘ज्या क्रमांकांवरून अभिषेकला कॉल येत होते, ते नंबर त्यांच्या कुटुंबियांनी आमच्याकडे दिले आहेत. त्यानुसार तपास सुरू झाला असून, मृत अभिषेकच्या बँक व्यवहारासंदर्भात चौकशी सुरू केली आहे’, असे पोलीस म्हणाले.

(Tarak Mehta Ka ooltah Chashmah fame writer Abhishek Makwana suicide family claims of black mailing)

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.