तारक मेहताचे नट्टू काका हरपले, अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन

काही महिन्यांपूर्वी त्याची दोन ऑपरेशन्सही झाली होती. ते 77 वर्षांचे होते. वयामुळे ते रोज शूटिंगला जाऊ शकत नव्हते, पण तरीही ते तारक मेहतांच्या टीमचा एक भाग होते.

तारक मेहताचे नट्टू काका हरपले, अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन
nattu kaka
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 7:57 PM

मुंबईः नट्टू काका अर्थात तारक मेहता का उल्टा चष्मातील अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले. ते अनेक महिन्यांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. काही महिन्यांपूर्वी त्याची दोन ऑपरेशन्सही झाली होती. ते 77 वर्षांचे होते. वयामुळे ते रोज शूटिंगला जाऊ शकत नव्हते, पण तरीही ते तारक मेहतांच्या टीमचा एक भाग होते. मालाडमध्ये ज्या रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी साडेपाच वाजता टीव्ही इंडस्ट्रीतील या दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले. तारक मेहताच्या कलाकारांना जेव्हा त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली, तेव्हा सर्वजण दुःखी झाले.

आज संध्याकाळी 5:30 वाजता त्यांनी या जगाचा निरोप घेतला

बागाची भूमिका साकारणारा तन्मय वखेरिया म्हणाला, “मला पहिल्यांदा बातमी मिळाली, कारण त्याच्या मुलाने मला संध्याकाळी 5:45 वाजता फोन केला. अखेर कर्करोगासमोर जीवनाला हार पत्करावी लागली आणि आज संध्याकाळी 5:30 वाजता त्यांनी या जगाचा निरोप घेतला. घनश्याम नायक उर्फ ​​नट्टू काका जेठालालची भूमिका करणाऱ्या दिलीप जोशीच्या खूप जवळचे होते.

त्यांना जगण्याची होती आशा

केमोथेरपी उपचारानंतरही घनश्याम नायक यांना पूर्ण विश्वास होता की ते पूर्णपणे बरे होतील आणि शूटिंगमध्ये परततील. या दरम्यान त्यांनी काही भागांचे चित्रीकरणही केले. जेव्हा त्यांनी 3 महिन्यांपूर्वी त्यांच्या तब्येतीबद्दल सांगितले, तेव्हा तारकच्या सेटवर परत येण्यास उत्सुक होते. “मी ठीक आणि निरोगी आहे. इतकी मोठी समस्या नाही. खरं तर प्रेक्षक उद्या तारक मेहता का उल्टा चष्माच्या एका भागात मला भेटतील. हा एक अतिशय खास भाग आहे आणि मला आशा आहे की, त्यांना माझे काम पुन्हा आवडेल. ”

मरेपर्यंत काम करायचे होते

घनश्याम नायक म्हणाले की, ते एक कलाकार आहेत आणि त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्या कामगिरीदरम्यान त्यांना मृत्यूही यावा अशी त्याची इच्छा होती. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण गुजराती आणि हिंदी मनोरंजन आणि नाट्य उद्योगातील त्यांचे योगदान प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील. कारण कलाकार मरतो, पण त्याची कला त्याच्या अस्तित्वाचा दिवा नेहमी त्याच्या मागे तेवत ठेवतो.

संबंधित बातम्या

Bigg Boss 15 | बिग बॉसचे जय भानुशालीसोबत स्पेशल कॉन्ट्रॅक्ट, 10 आठवडे होणार नाही एलिमिनेट !

Manoj Bajpayee’s father | ‘फॅमिली मॅन’च्या वडिलांचे निधन, दीर्घ काळापासून होते आजारी, दिल्लीमध्ये घेतला अखेरचा श्वास

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.