मुंबई : बांगलादेशी सुप्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन (Taslima Nasreen) या अनेकदा धर्माच्या मुद्यावर बेधडकपणे आपले मत व्यक्त करत असतात. नुकतेच त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये असेच बेधडक वक्तव्य केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बरेच वापरकर्ते यावर नकारात्मक प्रतिक्रियादेखील देत आहेत. तस्लीमा यांनी आपल्या या ट्विटमध्ये शोबीज म्हणजे मनोरंजन विश्वाला धर्मापेक्षा चांगले असल्याचे म्हटले आहे. आपल्या ट्वीटमध्ये तस्लीमा यांनी आपल्या या ट्विटमध्ये ज्यांनी मोठा पडदा सोडून, धार्मिक गुरूंचा आश्रय घेतला किंवा धर्माच्या मार्गाकडे वाटचाल केली, अशा कलाकारांची नावे घेत त्यांना टोला लगावला आहे (Taslima Nasreen Says Religion is not a better place than showbiz).
यामध्ये बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. तस्लीमा यांनी ट्विटमध्ये नाव घेतलेल्या सेलिब्रिटींमध्ये विनोद खन्ना, सुचित्रा सेन, जायरा वसीम आणि नुकतीच बॉलिवूडला ‘अलविदा’ म्हणणारी अभिनेत्री सना खान यांचा समावेश आहे.
तस्लीमा नसरीन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “विनोद खन्ना, सुचित्रा सेन, अनु अग्रवाल, बरखा मदन, सना खान, जायरा वसीम, शबाना, व्हॅनिटी, ख्रिस टकर, अँगस जोन्स, नरगिस, कर्क कॅमेरून, मॉन्टेल जॉर्डन, जुनैद जमशेद, कॅट स्टीव्हन्स … या सर्वांनी धर्मासाठी मनोरंजन विश्व सोडले. धर्म हे मनोरंजन व्यवसायापेक्षा चांगले स्थान नाही. काही लोकांना याबद्दल पश्चातापही झाला असेल.”
Vinod Khanna,Suchitra Sen,Anu Aggarwal,Barkha Madan, Sana Khan,Zaira Wasim,Shabana,Vanity, Chris Tucker,Angus Jones,Nargis,Kirk Cameron,Montell Jordan,Junaid Jamshed, Cat Stevens–all left showbiz for religion. Religion is not a better place than showbiz. Some must have repented.
— taslima nasreen (@taslimanasreen) December 4, 2020
तस्लीमा नसरीन यांच्या या वादग्रस्त ट्विटनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी यावर तस्लीमा नसरीन यांनाच बोल लगावले आहेत. तर काही वापरकर्त्यांनी त्याच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे (Taslima Nasreen Says Religion is not a better place than showbiz).
तस्लीमा नसरीनला गेल्या 25 वर्षांपासून त्यांच्या देशातून म्हणजेच बांगलादेशातून निर्वासित केले गेले आहे. तस्लीमा सतत इस्लामवर टीका करत असतात. यामुळेच त्यांच्यावर स्वतःच्याच देशात प्रवेश करण्यास बंदी घातली गेली आहे. सुरुवातीपासूनच तस्लीमा वेगवेगळ्या धर्मांबद्दल आपले मत व्यक्त करत आहेत. सर्व धर्मांमध्ये सुधार व्हावेत, अशी मागणी त्यांनी अनेकदा केली आहे. असे बरेच धर्म आहेत ज्यात फक्त हिंसाचाराची चर्चा आहे, असे तस्लीमा नसरीन म्हणतात.
सलमान खानची सहअभिनेत्री सना खानने अलीकडेच फिल्मी जगाला निरोप देऊन मुफ्ती अनस नामक व्यक्तीशी लग्न केले आहे. इस्लाम धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी तिने आपल्या कारकीर्दीला अलविदा म्हटले. त्याचप्रमाणे एक वर्षापूर्वी ‘दंगल गर्ल’ जायरा वसीमनेही चित्रपटसृष्टीशी असलेले आपले नाते तोडत असल्याची, अर्थात चित्रपटसृष्टी सोडत असल्याची घोषणा केली होती.
या अगोदरही अनेक चित्रपट कलाकारांनी सर्व काही सोडून तपस्वी आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांचेही नाव आह. विनोद खन्ना चित्रपट विश्व सोडून ओशोच्या आश्रयाला गेले. पण, ओशोंच्या आश्रमात काही वेळ घालवल्यानंतर तिचे मन तिथे अस्वस्थ झाले आणि ते पुन्हा बॉलिवूडमध्ये परतले.
(Taslima Nasreen Says Religion is not a better place than showbiz)