लवकर उठण्याचे फायदे,जागरणाने होणारं नुकसान…; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Aai Kuth Kay Karte Fame Actor Milind Gawali Post Viral : आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. लवकर उठण्याचे फायदे आणि उशीरा झोपण्याचे तोटे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. वाचा सविस्तर...
सध्या सगळ्याचं लाईफ प्रचंड बिझी झालं आहे. काम, सगळ्याच क्षेत्रातील स्पर्धा यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. रात्री उशीरापर्यंत जागतो आणि त्यामुळे सहाजिकच आपण सकाळी उशीरा उठतो. यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आजारपण बळावतं. या सगळ्यावर ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरूद्ध अर्थात अभिनेते मिलिंद गवळ यांनी भाष्य केलं आहे. या सगळ्यावर मार्मिक भाष्य करणारी पोस्ट मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलीय. त्यांची ही ‘सकाळी लवकर उठण्याचे फायदे आणि जागरणं करण्याचं नुकसान’ या शीर्षकाखाली मिलिंद गवळी यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
मिलिंद गवळी यांची पोस्ट जशीच्या तशी
सुप्रभात शुभ सकाळ
(सकाळी लवकर उठण्याचे फायदे आणि जागरणं करण्याचं नुकसान)
Contd ..आणि मी अनुभवाने सांगू शकतो की जी मुलं जागरणं करत होती त्यांना पुढे ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला, जी मुलं जागरण करायची ती खूप आजारी पडायला लागली comparatively रात्री जागरण न करणाऱ्या मुलांपेक्षा, पहाटे उठणाऱ्या मुलांमध्ये भरपूर energy excitement असायची , आणि रात्री जागरण करणाऱ्या मुलांमध्ये आळसपणा जास्त असायचा lethargic असायची ती मुलं, रात्री जागरण करणारी मुलं चिडचिडी झालेली ही मी पाहिली आहेत.
आता सध्या माझ्या कामाचं स्वरूप असं आहे की कमीत कमी 14 तास तुम्हाला fresh, energetic and alert राहणं अगदी आवश्यक आहे,ती basic गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला सातत्याने चांगलं काम करता येणारच नाही, daily soap आणि television serialचा माझा अनुभव आता बऱ्याच वर्षाचा आहे, या इतक्या वर्षांमध्ये मालिका करत असताना धेपाळलेली आजारी पडलेली किंवा कंटाळलेले अनेक कलाकार मी पाहिले ली आहेत, सुरुवातीला खूप उत्साहाने ते काम करायला येतात आणि हळूहळू त्यांची energy level down होत जाते, बर इथे कोणी कोणाचा सगा-सोयरा नसतो कोणी कोणाचा फार विचार करत बसत नाही, जे काम आहे ते तुम्हाला मुकाट्यानं करावंच लागतं, immune system कमी झालेली असते. आणि त्यामुळे physically शारीरिक दृष्ट्या affect आलेला असतोच पण, यापेक्षाही मानसिक दृष्ट्या खूपसे कलाकार हललेले असतात.
बरं ते त्यांच्या फार लवकर लक्षात येत नाही, शारीरिक त्रास दिसतो, जाणवतो त्याच्यावर उपाय करणे ही सोपं आहे पण मानसिक दृष्ट्या जर एखादा कलाकार हल्ला तर, त्याच्याही लक्षात यायला खूप वेळ लागतो, and both are interconnected, physical, and mental health, both.
आता मी काय यातला expert नाही आहे, पण माझा अनुभवातून कदाचित कुणाला तरी त्यांच्या न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. understanding yourself is important असं मला वाटतं , आता मी फार स्वतःची काळजी घेतो अशातला भाग नाहीये, माझ्यापेक्षा खूप पटीने उत्साही energetic लोकं आहेत.
मला सूर्योदयाच्या आधी उठायला आवडतं सूर्योदय पाहिला आवडतो, पहाटे उठून योगा प्राणायाम करायला अतिशय आवडतं , तो माझ्या आता सवयीचा भाग झाला आहे, आणि त्याने मला अतिशय फायदा पण झाला आहे, जो अनेक वर्ष झाला नव्हता, मी जितकं काम करू शकायचो त्याच्यापेक्षा आज नक्कीच दुपटीने मी काम करू शकतो तेवढी माझी क्षमता वाढली आहे असं मला वाटतं, पूर्वीपेक्षा जास्त उत्साहाने माझ्यात काम करायची ऊर्जा असते.
View this post on Instagram