कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन

माझ्या यशाचं गुपित, माझे लढण्याचे बळ, माझे मार्गदर्शक, माझी ताकद, माझा पाठीराखा, माझा बापमाणूस" अशा शब्दात अश्विनीने वडिलांचे वर्णन केले आहे. (Actress Ashvini Mahangade lost Father )

कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला, 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन
आई कुठे काय करते मालिकेतील अश्विनी महांगडेला पितृशोक
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 10:27 AM

मुंबई : कोरोना संसर्गाच्या काळात अनेक जणांवर आपल्या प्रियजनांना गमावण्याची वेळ आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिच्यावरही दुःखद प्रसंग ओढावला. कोरोनाशी झुंज देताना अश्विनीचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे कोरोनाशी लढताना निधन झाले. “कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला” अशा शब्दात अश्विनीने फेसबुकवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. (Aai Kuthe Kay Karte Anagha Marathi TV Actress Ashvini Mahangade lost Father Pradipkumar Mahangade due to Corona)

अश्विनीची फेसबुक पोस्ट

“कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला… कधी कधी स्वतःचे फाटलेले असले तरी शेवटपर्यंत लोकांसाठी करत राहिले आणि मलाही तेच शिकवले. गेले 15 दिवस कोरोनाशी वाघासारखे लढले, पण अखेरीस ही झुंज अपयशी ठरली. काळाने घाला घातला आणि आम्हाला पोरके केले. काल जाता जाता एक सांगून गेले, समाजासाठी काही केले नाही, तर आपले आयुष्य निरर्थक” अशी पोस्ट अश्विनीने लिहिली आहे. “नाना- माझ्या यशाचं गुपित, माझे लढण्याचे बळ, माझे मार्गदर्शक, माझी ताकद, माझा पाठीराखा, माझा बापमाणूस” अशा शब्दात अश्विनीने वडिलांचे वर्णन केले आहे.

कोण होते प्रदीपकुमार महांगडे?

पसरणी गावचे सुपुत्र ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यकर्मी, राजकारणातील भीष्माचार्य, हाडाचे शेतकरी आणि आपल्या मुलीमध्ये अभिनयाच्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेण्याचे स्वप्न साकार करणारे नाना उर्फ प्रदीप महांगडे असे त्यांचे वर्णन केले आहे. नाट्य कर्तृत्वाच्या पटांगणामध्ये कोणत्याही आधाराशिवाय, कोणत्याही मदतीशिवाय, कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना, नानांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून नाट्यप्रेम जोपासले. वाईत रंगकर्मीना एकत्र आणले आणि वाईची नाट्य चळवळ नावारूपाला आणली.

संगीत नाटकापासून लोकनाट्याच्या चळवळीतून प्रबोधन करणारेअनेक नाट्यप्रयोग नानांनी गावोगावी जाऊन यशस्वी करून दाखवले. चार कौटुंबिक नाटकांचे लेखनही त्यांनी केले. चार राज्यनाट्यची बक्षीसे मिळवून आणली. आपल्या मुलीमध्ये लहानपणीच असणारी अभिनय प्रतिभा त्यांनी ओळखली. (Actress Ashvini Mahangade lost Father )

अभिनेत्री अश्विनी महांगडेचे वडील

अश्विनी महांगडेची कारकीर्द

छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्येची अर्थात ‘राणू अक्कां’ची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडेने साकारली आहे. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान नावाने सेवाभावी संस्थाही ती चालवते. या संस्थेअंतर्गत आजवर तिने अनेक उपक्रम राबवले आहेत. अश्विनीने आपल्या संस्थेमार्फत महाराष्ट्रभर विनामूल्य जेवणाची व्यवस्था सुरु केली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही तिने नागरिकांना मदत केली होती.

संबंधित बातम्या :

कुणाला जेवणाचे डबे, तर कुणाला औषध, ‘लॉकडाऊन’मध्ये ‘आई कुठे काय करते’ची अभिनेत्री करतेय रुग्णांची मदत!

‘स्वराज्य रक्षक संभाजी’मधील अभिनेत्रीचं हॉटेल, 40 रुपयांत भरपेट जेवण

Aai Kuthe Kay Karte | सेटवर वडिलांच्या निधनाची बातमी, अभिनेते महाबोले म्हणाले सीन पूर्ण करणारच

(Aai Kuthe Kay Karte Anagha Marathi TV Actress Ashvini Mahangade lost Father Pradipkumar Mahangade due to Corona)

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.