कुणाला जेवणाचे डबे, तर कुणाला औषध, ‘लॉकडाऊन’मध्ये माणुसकी जपत ‘आई कुठे काय करते’ची अभिनेत्री करतेय रुग्णांची मदत!  

देशभरात कोरोनाची दुसरी लाट कहर करत आहे. ही दुसरी लाट अतिशय विध्वंसक ठरत आहेत. दररोज लाखो लोकांना कोरोनाची लागण होता आहे. तर, दुसरीकडे हजारो लोक लोक या विषाणूमुळे मृत्यूमुखी पडत आहेत.

कुणाला जेवणाचे डबे, तर कुणाला औषध, ‘लॉकडाऊन’मध्ये माणुसकी जपत ‘आई कुठे काय करते’ची अभिनेत्री करतेय रुग्णांची मदत!  
मधुराणी प्रभुलकर आणि अश्विनी महांगडे
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 4:05 PM

मुंबई : देशभरात कोरोनाची दुसरी लाट कहर करत आहे. ही दुसरी लाट अतिशय विध्वंसक ठरत आहेत. दररोज लाखो लोकांना कोरोनाची लागण होता आहे. तर, दुसरीकडे हजारो लोक लोक या विषाणूमुळे मृत्यूमुखी पडत आहेत. अशा भीषण परीस्थित लोकांना मदत करण्यासाठी काही कलाकार देखील पुढे सरसावले आहेत. आपापल्या परीने जमेल तशी मदत सगळेच करत आहेत. या काळात आपली माणुसकी जपत ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अनघा’ अर्थात अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) देखील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे (Aai Kuthe Kay Karte Fame Actress Ashvini Mahangade distributing free food to relatives of corona patients).

कुणाला औषध, तर कुणासाठी बेड शोधण्याची जबाबदारी घेता घेता आता अश्विनीने आता त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि या रुग्णांसाठी ‘अन्नदाना’सारखे काम हाती घेतले आहे. कुठल्याही मदतीचा गवगवा न करता अतिशय शांतपणाने ती लोकांची मदत करत आहे.

पाहा अश्विनीची पोस्ट

‘पेशंट सोबत असलेल्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सोय. कोरोनाच्या या महासंकटात बाहेर सर्वच गोष्टीची टंचाई निर्माण झाली आहे. या कठीण काळात आपल्या लोकांना आपली गरज आहे. आपण प्रत्येकजण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून जमेल तशी मदत करा. नक्कीच पुण्य मिळेल. आम्हीही शक्य ती व शक्य त्या ठीकाणी आमचं कर्तव्य पार पाडीत आहोत. तुम्हीही यामधे सामील व्हा.’, असे आवाहन तिने तिच्या या पोस्टमधून केले आहे. सध्या खंडाळा, फलटण, शिरवळ, सातारा, केसुर्डी अशा अनेक शहरांसाठी हा उपक्रम राबवला जात आहे (Aai Kuthe Kay Karte Fame Actress Ashvini Mahangade distributing free food to relatives of corona patients).

छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्येची अर्थात ‘राणू अक्कां’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान नावाने सेवाभावी संस्थादेखील चालवते. या संस्थेअंतर्गत आजवर तिने अनेक उपक्रम राबवले आहेत, याशिवाय गत वर्षी लॉकडाऊन दरम्यान देखील तिने अशाच प्रकारे लोकांची मदत केली होती.

सामाजिक कार्यात सहभाग

अभिनयासोबतच अश्विनी सामाजिक कार्यात देखील तितकीच सक्रिय आहे. आपण समाजाचं देणं लागतो, अशी गाठ पदराला बांधत ती या क्षेत्रात देखील खंबीरपणे उभी ठाकली आहे. या कठीण काळात कुणीच उपाशी राहू नये, म्हणून अश्विनीने आपल्या संस्थेमार्फत महाराष्ट्रभर विनामुल्य जेवणाची व्यवस्था सुरु केली आहे.

स्त्रियांच्या समस्यांविषयी जनजागृती

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सामजिक कार्य्सोबातच जनजागृतीचे कार्य देखील हाती घेतले आहे. स्त्रियांची मासिक पाली आणि त्यासंबंधातील अंधश्रद्धा-गैरसमज याबाबतीत जनजागृती करण्यासाठी तिने ‘महावारी’ नावाचा लघुपट तयार केला होता. याशिवाय दुर्गम भागांमध्ये जाऊन तिने स्वतःदेखील या विषयी जनजागृती केली होती.

(Aai Kuthe Kay Karte Fame Actress Ashvini Mahangade distributing free food to relatives of corona patients)

हेही वाचा :

ऐकलंत का? तुमच्या लाडक्या ‘चिंटू’ला आवाज हवाय, मग बालमित्रांनो तयार व्हा आणि ऑडिशन द्या!

Video | ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना…’, कीर्तीचा हा डान्सिंग अंदाज पाहून चाहतेही म्हणाले वा!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.