Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालिका संपल्यानंतर भेटले ‘आई कुठे काय करते’चे कलाकार; कौमुदीच्या केळवणाचे फोटो चर्चेत

Kaumudi Walokar Kelwan : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील कलाकार भेटले, निमित्त होतं कौमुदी वलोकर हिच्या केळवणाचं... अभिनेत्री कौमुदी लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. त्याआधी तिच्या सहकलाकारांनी तिचं केळवण केलं. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. पाहा...

मालिका संपल्यानंतर भेटले 'आई कुठे काय करते'चे कलाकार; कौमुदीच्या केळवणाचे फोटो चर्चेत
कौमुदी वलोकरचं केळवणImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 11:34 AM

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आरोही अर्थात अभिनेत्री कौमुदी वलोकर ही लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. आकाश चौकासे याच्यासोबत कौमुदी विवाहबद्ध होणार आहे. त्याआधी तिच्या सहकलाकारांनी तिचं केळवण केलं. तिची जवळची मैत्रिण ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनघा अर्थात अभिनेत्री अश्विनी महांगडे, यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुख त्याची पत्नी, अनिश म्हणजेच अभिनेता सुमंत ठाकरे यांनी कौमुदीचं केळवण केलं. कौमुदीला खास सरप्राईज दिलं. याबाबतची पोस्ट अश्विनीने शेअर केली आहे. जी मुलगी कायम इतर लोकांना असे सरप्राइज देते तिच्यासाठी प्लॅन करायचे म्हणजे आम्हा सगळ्यांना फार जपून पाऊल टाकावी लागली, असं म्हणत अश्विनीने तिच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडेची पोस्ट

कौमुदीचे केळवण ……

जी मुलगी कायम इतर लोकांना असे सरप्राइज देते तिच्यासाठी प्लॅन करायचे म्हणजे आम्हा सगळ्यांना फार जपून पाऊल टाकावी लागली.😝 म्हणून कुडाळला जावून हे केळवण करण्याचा प्लॅन @archanapatkar10 म्हणजे आमच्या आज्जीचा. अर्थात काही कारणास्तव आजी ल शक्य झाले नाही पण ती आमच्यात होतीच. Location बदलले तरी फील तसाच होता.

आम्हा 4 जणांसाठी हे खरे तर घरातलेच लग्नं आहे. त्यामुळे लगीनघाई अगदी फक्त पुण्यामध्ये सुरू आहे असे नाही. तर ती पसरणीमध्ये ही सुरू आहे. कौमुदीसाठी करतोय तर तिला काय आवडते यापासून तिला झेंडू नाही आवडत पण मला आवडतो म्हणून तिला चालेल इथपर्यंतचा हा माझा प्रवास होता. कारण तिला माणूस आवडला की ती त्यासाठी काहीही करायला तयार असते.

प्रवासात माणूस उमगतो तसे आम्ही एकमेकांना समजून घ्यायला लागलो. आमच्या खास मैत्रिणीचे लग्नं म्हणजे आनंद आहे आणि ती आता किती सोबत असेल म्हणून मनात धाकधूक सुद्धा आहेच. पण आमचे दाजीसाहेब @aakash_chowkase यांना भेटून चिंता मिटली. कौमुदीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचे सगळे प्लॅनिंग कमाल झाले याने आम्हाला हायसे वाटले. तिला निसर्ग आवडतो म्हणून जागाही तशीच होती. त्याचे प्लॅन @bhagyashalianup ने केले. एकंदरीत या केलवणामुळे अनेकांना आनंद झाला ती सगळी माझी मंडळी त्यांचे आभार आभार ….

@brownstoneresort चे मालक आणि माझा मित्र मिलिंद शिंदे चे आभार. माझी मम्मीचे @vidyapradipkumarmahangade सुद्धा आभार कारण यात गोष्टींची जमवाजमव तिने फार छान केली. @madhuri_vivi , @pranav__gujar यांचे तर खूप आभार कारण मज्जा त्यांच्यामुळे आली. त्यामुळे हे केळवण आम्ही 4 जणांनी प्लॅन केले असते तर या मंडळींमुळे जास्त सोप्पे झाले सगळे. आमची कौमुदी कायम आनंदी राहावी आणि पुढील आयुष्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा…

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.