‘पुन्हा कर्तव्य आहे’ मधील आकाश म्हणतो, दोन लहान मुलींच्या बाबांची भूमिका…

Actor Akshay Mhatre on Punha Kartavya Aahe Serial : झी मराठीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेतील आकाश अर्थात अभिनेता अक्षय म्हात्रे याने बाबांची भूमिका साकारतानाचे अनुभव सांगितले. तसंच अक्षयने त्यांच्या बाबांसोबतच्या आठवणीही सांगितल्या. वाचा सविस्तर...

'पुन्हा कर्तव्य आहे' मधील आकाश म्हणतो, दोन लहान मुलींच्या बाबांची भूमिका...
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 8:29 PM

ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला, तरी समोरच्या संकटांना, लढा देण्याची प्रेरणा मिळते, ते म्हणजे बाबा…. अभिनेता अक्षय म्हात्रे याने फादर्स डे निमित्त ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत बाबाची भूमिका साकारत असताना आलेले अनुभव सांगितले. तसंच आपल्या वडिलांसोबतच्या गोड आठवणींना उजाळा दिला. ‘मी पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये दोन लहान मुलींच्या बाबाची भूमिका साकारत असताना अनेक गोष्टी शिकतोय. सगळ्यात पहिले म्हणजे त्यांच्यासोबत काम करत असताना संयम शिकलो आणि मी हे खूप सकारात्मक दृष्टिकोनातून बोलत आहे, असं अक्षय म्हणाला.

दोन मुलींचा बाबा साकारताना…

निस्वार्थ प्रेम जे ओव्हर द इयर्स जसे आपण आयुष्यात पुढे जातो आपल्या मध्ये ते कमी होत जातं. आपण तोलून मापून आणि जपून बोलतो पण लहान मुलांमध्ये ते फिल्टर नसत. ते कुठल्याही स्वार्थाने वागत नाहीत बोलत नाहीत. त्यांच्या सगळ्या भावना निर्मळ आहेत आणि ती गोष्ट शिकण्यासारखी आहे, असं अक्षय म्हात्रे याने सांगितलं.

महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर लहान मुलं गोष्टी लवकर आणि खूप सहजतेने शिकतात. मी चिनू-मनूचा ऑनस्क्रीन बाबा आहे, पण ऑफस्क्रिन त्याच्याशी मस्ती करत असताना मी भान ठेवतो की मी काय बोलतोय आणि कसा वागतोय कारण ते आपल्याला बारकाईने पाहून शिकत असतात. त्या दोघींच्या सहवासात राहून एक ऊर्जा वाढते की आपण ही उत्तम माणूस व्हावं म्हणजे ते ही आपल्याकडून चांगल्या गोष्टी शिकतील, असंही अक्षय म्हणाला.

“आमचे बाबा कडक शिस्तीचे”

माझं आणि माझ्या बाबांचं नातं थोडं वेगळं आहे. लहानपणी बाबांसोबत तसं मैत्रीच नातं नव्हतं. माझे बाबा थोडे कडक शिस्तीचे होते म्हणून लहानपणी आमच्या गप्पा आणि बोलणं तसं नव्हतं आणि मी ही थोडा शांत होतो. आमचं नातं माझ्या वयाच्या 20 व्या वर्षांमध्ये मध्ये खुलत गेलं. आम्ही वेगवेगळ्या विषयवर बोलू लागलो मग ते सिनेमा, राजकरण किंवा रोजच्या आयुष्याच्या घडामोडी असो. आता अशीवेळ आली आहे की मी माझ्या आईपेक्षा बाबांशी तासंतास बोलतो. बाबांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे ते न बोलता खूप काही करुन जातात, त्यांच गोष्टींकडे बारीक लक्ष असतं कोणाला काही मदत लागणार असेल किंवा घरात कश्याची गरज असेल ते बरोबर लक्ष देऊन ती गरज पूर्ण करतात, असं म्हणत अक्षयने त्याच्या बाबांसोबतच्या आठवणी सांगितल्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.