नातं बिघडलं की ते पूर्वीसारखं व्हायला…; अनिरूद्ध साकारणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Milind Gawali Post About Aai Kuthe Kay karte : अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट लिहिली आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेतील पात्रांबाबत मिलिंद गवळी यांनी पोस्ट लिहिली आहे. नाते संबंध आणि अनिरूद्ध हे पात्र साकारतानाचा अनुभव त्यांनी शेअर केलाय. वाचा सविस्तर...

नातं बिघडलं की ते पूर्वीसारखं व्हायला...; अनिरूद्ध साकारणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
'आई कुठे काय करते'Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 8:15 PM

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ही मालिका सध्या नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. अनिरुद्ध आणि संजना हे ‘समृद्धी’ बंगला पाडून त्या जागेवर टॉवर उभा करण्याचं स्वप्न पाहत आहेत. पण त्यांच्या स्वप्नपूर्तीला अरुंधतीचा विरोध आहे. आई आणि अप्पा यांच्या घरावर त्यांचा हक्क आहे, तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असं अरुंधती ठणकावून सांगते. मालिकेत हा असा ट्रॅक सुरु असतानाच अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केलीय. यात त्यांनी नातेसंबंधांवर भाष्य केलंय.

मिलिंद गवळी यांची पोस्ट जशीच्या तशी

अनिरुद्ध चा possessiveness अनिरुद्ध आणि अरुंधती चं नातं दिवसान दिवस बिगडत चाललंय, आणि त्यांच्या बिघडलेल्या नात्यामुळे त्या दोघांशी connected असलेल्या लोकांचे म्हणजेच पात्रांचे हाल होताहेत. एकदा एखादं नातं बिघडलं की ते परत पूर्वीसारखं व्हायला फारच मुश्किल असतं, पूर्वी जो प्रेम आपुलकी आदर होता तो परत तसाच येईल याची काही guarantee नाही, एखाद्या धागा जर तुटला तर पुन्हा त्याला एक सारखं करण्यासाठी आपण गाठ मारतो , तो धागा परत पूर्वीसारखा होत नाही त्यामध्ये एक गाठ असते आणि काही नात्यांमध्ये तर अनेक गाठी निर्माण होतात किंवा त्या नात्यांचा अगदी गुंता होऊन जातो, आणि तो गुंता बरेच जणांना आयुष्यभर सोडवताच येत नाही.

“आई कुठे काय करते” या मालिकेमध्ये नात्यांची जी गुंतागुंत आहे ती इतकी भारी आहे की आपण पण त्याच्यामध्ये गुंतत जातो! या मालिकेमध्ये इतक्या घडामोडी घडत असतात की आपल्याला उसंतच मिळत नाही . परत प्रत्येक वेळेला काही ना काही तरी घडतच असतं आणि प्रत्येक वेळेला आपल्याला आश्चर्यच वाटत राहतं की अरे याचाच आपण विचारच केला नव्हता.  हे असं कसं घडलं आणि तेवढ्याच दहा-बारा कॅरेक्टर मध्ये हे सातत्याने घडवायचं असतं सातत्याने उत्सुकता वाढवायची असते हे फारच कठीण काम आहे जे नमिता सतत करत असते ती करत असताना तिची होणारी ओढाताणआम्हाला बघायला मिळते.

खूपसे लोक ही मालिके मधल्या पात्रांशी त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्याशी जोडत असतात आणि मलाही असं वाटतं की थोडं फार साम्य असू शकेल पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे ही एक मालिका आहे ही काय सत्य घटनेवर आधारित एखादी गोष्ट किंवा एखाद्याचं खरं खरं आयुष्य नाही.

मालिका म्हणजे दिवसातून एक अर्धा तास एका वेगळ्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जाते. जे प्रेक्षकांना आपलंसं वाटेतं आणि खरं वाटतं , याचा अर्थ ते खरं खरं आहे असं होत नाही, अनेक लोक प्रामाणिकपणे ही मालिका दररोज बघत असतात, मला खरंच त्यांचं खूप कौतुक वाटतं, त्यातल्या अनेक लोकांना हे सगळं खरोखर आहे असंच वाटत असतं. कधीतरी या खऱ्या शूटिंगचा अनुभव घ्यायला मिळाला तर लक्षात येईल एकही कलाकारा त्या पात्रच्या मूळ स्वभावाप्रमाणे नाहीहे. प्रत्येक जण अगदीच वेगळा आहे.

देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.