नाना पाटेकर मुंबई सोडून गावी राहायला का गेले?; म्हणाले, मी तिकडंच…
Nana Patekar on Mumbai Lifestyle : अभिनेते नाना पाटेकर हे सध्या मुंबईत राहत नाहीत. तर ते गावी जाऊन राहत आहेत. गावाकडे ते वास्तव्य का करत आहेत? त्यांनी मुंबई का सोडली? याबद्दल नाना पाटेकर बोलते झाले. मुंबई सोडून गावी जाऊन राहण्याचं कारण नाना पाटेकरांनी सांगितलं आहे.
मुंबईतील स्पीड जरी सुरुवातीला सगळ्याना आवडत असला तरी या धकाधकीच्या जीवनाच्या एका टप्प्यावर कंटाळा येतो. या स्पीड नकोसा वाटतो. गड्या आपला गाव बरा…, असं वाटू लागतं. मग काहीजण गावचा रस्ता धरतात. अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील मुंबई सोडून गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल नाना पाटेकर बोलते झाले. ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होते. ‘वनवास’ चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी नाना पाटेकर या कार्यक्रमात आले होते. तेव्हा त्यांनी मुंबई सोडण्याचं कारण सांगितलं.
नाना पाटेकर गावी का राहतात?
मी या व्यवसायातील नाही, मी गावाकडचा माणूस आहे. मी इकडे काम करतो, आणि परत गावात जातो. मी गाव-खेड्यात राहतो, आणि तिथेच राहणार, तिकडेच बरे वाटते, असं नाना पाटेकर म्हणाले. याच कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी प्रेक्षकांना उद्देशून किस्सा सांगितला. या सेटवर मी आत्ता जेव्हा आत गेलो होतो, तेव्हा मी श्री. बच्चन यांना विचारले की, ‘तुम्ही इतके काम का करता? गावात येऊन आठवडाभर रहा. तिकडे फारच निवांत वाटते. त्यावर त्यांनी मला सांगितले की, ते दिवासातले 12 तास काम करतात. त्याबद्दल मी त्यांच्यापुढे नतमस्तक आहे, असं नाना पाटेकर म्हणाले.
गावाकडे असताना दिनचर्या कशी असते?
मी सकाळी उठतो, तिकडे मी स्वतःचे एक जिम बनवली आहे. माझ्याकडे दोन गायी आणि एक बैल आहे. आणखी काही असण्याची गरजच नाही- मीच सगळं काही करतो. न्याहारी, जेवण माझं सगळं जेवण मीच बनवतो. मी खरोखर चांगले जेवण बनवतो. कधी कधी तर मला वाटते की, तर माझी चित्रपटात कारकीर्द झाली नसती, तर मी एक छोटेसे हॉटेल उघडले असते. पण, मी जितकी अपेक्षा केली होती, त्यापेक्षा आयुष्याने मला खूप जास्त दिले आहे. माझ्या गरजा अगदी साध्या झाल्या आहेत, असं नाना पाटेकर म्हणाले.
‘वनवास’ चित्रपटातील कलाकार नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहणार आहेत. नाम फाऊंडेशनसाठी नाना पाटेकर खेळले. यावेळी नाना पाटेकर त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल बोलताना दिसले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर नाना पाटेकर बोलते झाले.