इंजिनिअर बनण्यासाठी मुंबईत आलेला रवी दुबे, अचानक मनोरंजन क्षेत्राकडे वळला! जाणून घ्या त्याचा ‘हा’ खास प्रवास..

मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता रवी दुबे (Ravi Dubey) हा असा कलाकार आहे, ज्याने प्रत्येक भूमिकेत नेहमीच उत्कृष्ट अभिनय केला आहे. रवी दुबे यांच्या कारकिर्दीतील त्याचे कर्तृत्व खरोखरंच कौतुकास्पद आहे.

इंजिनिअर बनण्यासाठी मुंबईत आलेला रवी दुबे, अचानक मनोरंजन क्षेत्राकडे वळला! जाणून घ्या त्याचा ‘हा’ खास प्रवास..
रवी दुबे
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 5:54 PM

मुंबई : मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता रवी दुबे (Ravi Dubey) हा असा कलाकार आहे, ज्याने प्रत्येक भूमिकेत नेहमीच उत्कृष्ट अभिनय केला आहे. रवी दुबे यांच्या कारकिर्दीतील त्याचे कर्तृत्व खरोखरंच कौतुकास्पद आहे. या इंडस्ट्रीत आपले नाव कमावण्यासाठी त्याने अथक परिश्रम घेतले, यात काही शंकाच नाही. काहींना ही प्रसिद्धी कदाचित सरळ सोपी वाटेल. परंतु, वास्तविक आयुष्यात त्याने घाम गाळून आणि कठोर परिश्रम करून हा यशाचा टप्पा गाठला आहे (Actor Ravi Dubey Share his Actor journey video on social media).

आजपर्यंत अभिनेता म्हणून रवी दुबे याच्याबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकले असतीलच. पण फार कमी लोकांना हे माहिती आहे की, तो मुंबईत केवळ इंजिनिअर होण्यासाठी आला होता. तुम्हाला नाही बसला ना विश्वास? चला तर, रवी दुबे यांच्या जीवनातील काही गोष्टी, त्याच्याच शब्दांद्वारे जाणून घेऊया…

इंजिनिअर बनण्यासाठी आला आणि अभिनेता झाला!

अलीकडेच रवीने त्याच्या या मुंबईतल्या अभिनय प्रवासाबद्दल बोलताना चाहत्यांसोबत काही गोष्टी शेअर केल्या. तो म्हणाला, ​​“मी मूळचा गुडगावचा आहे, जिथे अभिनेता होण्याची कल्पना देखील आसपास फिरकत नाही. म्हणून, इतर सर्वांप्रमाणेच मी देखील माझ्यासाठी आणखी एखादे असे करिअर शोधत होतो, जे मी सहज पूर्ण करू शकेन.”

वडिलांनी सुचवला प्लॅन ‘बी’

अभिनेता पुढे म्हणाला, “नंतर माझ्या वडिलांनी मला आयुष्यात प्लॅन ‘बी’ अर्थात अभियंता व्हायला पाहिजे, असे सुचवले. तथापि, माझ्या वडीलांना मनातून नेहमीच ठाऊक होते की, मी या सर्जनशील जगात माझे स्थान निर्माण करीन आणि म्हणूनच मी अभियांत्रिकीसाठी मुंबईची निवड केली आणि इतर कोणतेही दुसरे शहर निवडले नाही. पण वडिलांची दूरदृष्टी तंतोतंत खरी ठरली आणि मी माझ्या कॉलेजच्या तिसऱ्या वर्षामध्ये बर्‍याच जाहिराती करण्यास सुरुवात केली.”

शेवटी रवी दुबे म्हणाला, “शेवटी मी टेलिव्हिजन उद्योगात प्रवेश केला आणि आता सरगुन व मी देवाच्या कृपेने टेलिव्हिजनसाठी चांगली सामग्री तयार करत आहोत. खरं सांगायचं तर, माझ्या आयुष्यात जे काही आहे त्याबद्दल मी आभारी आहे.” (Actor Ravi Dubey Share his Actor journey video on social media)

कोरोनावर यशस्वी उपचार

अलीकडेच रवी दुबेला कोरोना विषाणूची लागण झाली होती. सध्या, रवी पूर्णपणे एकांतवासात आहे आणि स्वत:ची काळजी घेत आहे. रविवारी रवीने इंस्टाग्रामवर स्वत:चा एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने एका खोलीत बंदिस्त असल्याने, तो एकाकीपणातून मुक्त होऊ इच्छित असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. रवीचा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांनी खूप लाईक केला होता. जगभरातील चाहते त्याला लवकर बरे वाटावे म्हणून शुभेच्छा पाठवत आहेत.

पाहा रवीचा व्हिडीओ

(Actor Ravi Dubey Share his Actor journey video on social media)

हेही वाचा :

Photo : ‘इन आखों की मस्ती के…’, देवोलीना भट्टाचार्याचे हे सुंदर फोटो पाहिलेत?

Photo: साक्षी मलिकचा हॉट अवतार, सोशल मीडियात ‘खलीवली’

बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.