पवित्र रिश्तामधली सिंपल अर्चना ते बिग बॉसमधली मी…; अंकिता लोखंडेकडून चाहत्यांचे आभार

Ankita Lokhande Shared New Post About Pavitra Rishta and Bigg Boss 17 : बिग बॉस संपताच अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने एक खास पोस्ट शेअर केलीय. अंकिता लोखंडेने चाहत्यांचे आभार मानले आहेत. अंकिता म्हणाली, तुम्हाला Virtual झप्पी! अंकिताने शेअर केलेला हा व्हीडिओ तुम्ही पाहिलात का?

पवित्र रिश्तामधली सिंपल अर्चना ते बिग बॉसमधली मी...; अंकिता लोखंडेकडून चाहत्यांचे आभार
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 9:13 PM

मुंबई | 30 जानेवारी 2024 : बिग बॉसचा 17 वा सिझन संपला आहे. हा सिझन बऱ्याच कारणांनी गाजला. स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारूकीने जरी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली असली. तरी या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती एका खास जोडीची… अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन या दोघांची बिग बॉसच्या या सिझनमध्ये जोरदार चर्चा झाली. लोकांनी या जोडीला प्रेम दिलं. या दिलेल्या प्रेमासाठी अंकिता लोखंडेने चाहत्यांचे आभार मानलेत. तिने एक व्हीडिओ शेअर करत तिने चाहत्यांना धन्यवाद दिले आहेत.

अंकिताकडून चाहत्यांसाठी खास पोस्ट

एक प्रवास पवित्र रिश्तापासून सुरु झाला होता. आता हा प्रवास आणखी जास्त आठवणीत राहणारा झाला आहे. त्याला कारण आहे, ‘रिश्तो वाली लडकी’ला तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे… माझं हरणं किंवा जिंकणं तितकं महत्वाचं नाही. जितकं तुमचं माझ्यावरचं प्रेम आणि विश्वास आहे. तुमच्या प्रेमानेत मला इथं पर्यंत पोहोचवलं आहे, असं अंकिता म्हणाली.

अंकिताने मानले चाहत्यांचे आभार

अर्थातच चढ-उतार येत होते… थोडं निघून गेलं. थोडं थांबलं. पण या सगळ्यात तुम्ही लोक माझ्या पाठीशी उभे राहिलात! मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि प्रेम केल्याबद्दल तुमच्यापैकी प्रत्येकाचे खूप खूप आभार. सर्व #AnkuHolics, आपण सर्वांनी केलेल्या प्रयत्नांसाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद हा शब्द अगदी लहान आहे. पण तुमच्यासाठी एक Virtual झप्पी!, असं अंकिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सलमान खानला धन्यवाद

अंकिता लोखंडेने अभिनेता सलमान खानचेही आभार मानलेत. तुम्ही माझ्यासोबत जे बोललात. त्यामुळे मी टिकून राहिले. गोड शब्दांसाठी सलमान सर यांचे विशेष आभार, असं अंकिता म्हणाली. ही पोस्ट खास सगळ्या चाहत्यांसाठी आहे. तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल मी तुमचे आभार मानते. मनापासून धन्यवाद, असं म्हणत अंकिताने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.

बिग बॉसच्या घरातील काही खास फोटो अंकिताने शेअर केले आहेत. बिग बॉस 17 च्या घरातील ही शेवटची रात्र होती, असं म्हणत अंकिताने हे फोटो शेअर केलेत.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....