‘आई कुठे काय करते’ मालिका संपताच मधुराणीचे डोळे पाणावले; म्हणाली, आई हे तत्व…
Madhurani Prabhulkar Post About Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका संपताच मधुराणी प्रभुलकरची भावनिक पोस्ट लिहिली आहे. या मालिकेविषयीच्या भावना मधुराणीने शेअर केल्या आहेत. यात तिने आई म्हणजे नक्की काय? हे तिच्या शब्दात सांगितलं आहे. वाचा सविस्तर...
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने पाच वर्षे मनोरंजन केल्यानंतर प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका म्हणजे आईचं आई पण साजरं करणारी आणि ‘आईविना संसाराचा कारभार चालेना’ हा नकळतपणे संदेश देणारी होती. या मालिकेने घरातील आईकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. या मालिकेतील अरुंधतीने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं. पण ही मालिका संपताच अरुंधती हे पात्र साकारणी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर भावूक झाली. मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी होतं. इन्स्टाग्रामवरही मधुराणीने भावनिक पोस्ट लिहिली आहे.
मधुराणीने साकारलेली अरुंधती प्रेक्षकांना भावली. प्रत्येकाने तिच्या या पात्रात स्वत: च्या आईला शोधलं. त्याचमुळे या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. ‘आई कुठे काय करते’चा प्रवास आज संपला नाही, तर तो थांबला… कारण आई हे तत्व आहे, ते संपेल कसं?, अशी पोस्ट मधुराणीने शेअर केली आहे.
मधुराणीची पोस्ट
आई कुठे काय करते चा प्रवास आज थांबला…. पण तो संपला नाही… कारण आई हे तत्व आहे….. ते कस संपेल… तो अनेक वर्षं असंख्य जणांच्या मनात घर करून राहणार आहे. मायबाप प्रेक्षकांचे आणि त्या विधात्याचे संपूर्ण टीम कडून मी पुन्हा एकदा आभार मानते….!!!
View this post on Instagram
अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने देखील तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनघा या तिच्या पात्राविषयी आणि मालिकेविषयी अश्विनी व्यक्त झाली आहे.
अश्विनीची इन्स्टाग्राम पोस्ट
आई कुठे काय करते…….. #1491भाग
#अनघा या व्यक्तीरेखेचा प्रवास संपला. (मालिकेतील माझा पहिला फोटो ते #समृद्धी चा शेवटचा सण)
या प्रवासात मी घडले. #समृध्दी ने अधिक समृध्द केले. या प्रवासात सोबत असणारी सगळीच माणसं फार महत्त्वाची आहेत. कधी कधी आलेले एकटेपण सुद्धा सोबतच्या माणसांनी वाटून घेतले. @archanapatkar10 रोज सकाळच्या एका मिठीची आठवण येतेय. @kishormahabole आप्पा, मी 1000 वेळा सिन मध्ये लिहिलेले नसेल तरी तुमच्यासाठी चहा आणायला तयार आहे. @ravikarmarkar सर.. संकटांशी लढता यावे एवढी ताकद तुम्ही कायम दिली आणि म्हणून #अनघा शेवटच्या दिवसापर्यंत प्रवास करू शकली. मी कायम ऋणी असेन.
View this post on Instagram