Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर थिरकण्यासाठी पूजा सावंतने घेतली ‘इतकी’ मेहनत, पाहा व्हिडीओ…

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहऱ्यापैकी एक अशी ओळख असणारी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) सध्या चांगलीच चर्चेत आहे. पूजा सावंत ही महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर या डान्स शोमध्ये जजची जबाबदारी पार पाडत होती.

Video | ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर थिरकण्यासाठी पूजा सावंतने घेतली ‘इतकी’ मेहनत, पाहा व्हिडीओ...
पूजा सावंत
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 7:17 AM

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहऱ्यापैकी एक अशी ओळख असणारी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) सध्या चांगलीच चर्चेत आहे. पूजा सावंत ही महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर या डान्स शोमध्ये जजची जबाबदारी पार पाडत होती. नेहमी आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असलेली पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच चर्चेत असते. ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’मध्ये परीक्षकाची भूमिका निभावणाऱ्या पूजाने स्वतःदेखील एका नृत्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. तिचा हा रिहर्सल व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत (Actress Pooja Sawant Dance Rehearsal video for Maharashtras best dancer finale).

या व्हिडीओमध्ये पूजा डान्ससाठी तालीम अर्थात रिहर्सल करताना दिसत आहे. एका नृत्यासाठी किती मेहनत करावी लागते, हे पूजाच्या या व्हिडीओमधून दिसून येत आहे. या व्हिडीओत पूजासह सह परीक्षक धर्मेश येलांडे देखील दिसत आहे. ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या महा अंतिम सोहळ्यासाठी ही तयारी सुरु होती. हा सोहळा नुकताच पार पडला आहे.

पाहा पूजा सावंतचा व्हिडीओ

प्रथमेश माने ठरला विजेता!

प्रसिद्ध डान्स शो ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. प्रथमेश माने याने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. प्रथमेशने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. प्रथमेशने विजयाचे श्रेय आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना दिले आहे (Actress Pooja Sawant Dance Rehearsal video for Maharashtras best dancer finale).

महा अंतिम सोहळ्याला दिग्गजांची हजेरी!

मागील काही दिवसांपासून सोनी मराठी चॅनेलवर ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’ शो सुरू होता. अखेर 14 मार्च रोजी या शोच्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’ शो च्या ग्रँड फिनालेमध्ये प्राची प्रजापती, दीपक हुलसुरे, अपेक्षा लोंढे, प्रथमेश माने आणि आदिती जाधव या स्पर्धकांचा समावेश होता. महाअंतिम सोहळ्याच्या निमित्ताने या शोमध्ये सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनीही उपस्थिती लावली होती.

पूजा सध्या चर्चेत!

हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत डँशिंग पर्सनॅलिटी अशी ओळख असणारा अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री पूजा सावंत एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा मध्यंतरी खूप रंगली होती. व्हॅलेंटाईन वीक सुरु असताना या दोघांमधील काही खास मॅसेजेस समोर आले होते. यात गश्मीरने पूजासाठी काही तरी खास प्लॅन केल्याचेही म्हटले होते. मात्र, हा केवळ चित्रपट प्रमोशनचा भाग असल्याचे कळल्याने सगळ्या चर्चांना सुरुंग लागला.

‘लव्ह यू मित्रा’ या आगामी चित्रपटामध्ये पूजा सावंत, गश्मीर महाजनी ही बेस्टफ्रेन्ड्स असलेली जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार असून आणखी एका कलाकारचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता हा तिसरा कलाकार कोण असणार, हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

(Actress Pooja Sawant Dance Rehearsal video for Maharashtras best dancer finale)

हेही वाचा :

मराठी मनोरंजन विश्वातल्या ‘या’ प्रसिद्ध जोडीला कोरोनाची लागण, घरातच झालेयत सेल्फ क्वारंटाईन

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.