सुरुवात गोड तर सगळंच गोड…; अभिनेत्रीने सुबोध भावेला दिलं खास गिफ्ट
Actress Shivani Sonar and Subodh Bhave : अभिनेत्री शिवानी सोनारकडून अभिनेता सुबोध भावेला एक गोड सरप्राईझ.... सुरवात गोड तर सगळंच गोड म्हणत शिवानीने सुबोधला छोटंसं गिफ्ट दिलं आहे. 'तू भेटशी नव्याने' या मालिकेत सुबोध आणि शिवानी एकत्र दिसणार आहेत. वाचा सविस्तर...
अभिनेत्री शिवानी सोनार हिने अभिनेता सुबोध भावे याला खास गिफ्ट दिलं आहे. सुबोधने साकारलेल्या भूमिकांच्या फोटोची फ्रेम शिवानीने सुबोधला दिली आहे. सुरुवात गोड तर सगळंच गोड म्हणून माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट… सुबोध सरांची मला आवडलेली आत्तापर्यंतची कामे… आता ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही छोटीशी भेटवस्तू, असं म्हणत शिवानीने ही खास पोस्ट शेअर केलीय. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत सुबोध आणि शिवानी एकत्र दिसणार आहेत.
‘तू भेटशी नव्याने’ मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून सुरू होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आहे. ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर लवकरच पाहता येणार आहे. मालिकेचं चित्रीकरणही पार पडलं आहे. या वेळी सुबोध आणि शिवानी एकमेकांना भेटले. या संधीची आतुरतेनी वाट पाहत असलेल्या शिवानीने ही संधी आपल्या हातून घालवली नाही.
शिवानीकडून सुबोधला खास गिफ्ट
सगळ्या कलाकारांचं सुबोध भावे बरोबर काम करण्याचं स्वप्न असतं. तसंच शिवानीसाठीही ही एक खास संधी आहे. तिचंही हे एक स्वप्न होतं आणि ते आता सत्यात उतरणार आहे. या संधीचं ती नक्कीच सोनं करेल यात शंका नाही. मात्र या भेटीत शिवानीने सुबोधबद्दलचा आदर व्यक्त केला. तिनं स्वतः पाहिलेल्या आणि तिला आवडलेल्या सुबोधच्या चित्रपटांच्या पोस्टर्सची एक फोटोफ्रेम सुबोधला भेट म्हणून दिली. ही फ्रेम देताना तिच्या चेहऱ्यावरच्या भावना आपल्याला दिसतील आणि सुबोधप्रति असलेला आदर आपल्याला पाहायला मिळेल. सुबोधही हे सरप्राईझ पाहून आनंदित झाला. सुबोधने ही चकित करणारी भेट स्वीकारत शिवानीचं कौतुक केलं आणि तिच्याबरोबर काम करण्यासाठी तोही उत्सुक असल्याचं सांगितलं.
‘तू भेटशी नव्याने’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सोनी मराठी वाहिनीने ‘तू भेटशी नव्याने’ ह्या मालिकेचं चित्रीकरण सुरू केलं आहे. चित्रीकरणाला सुरुवात झाली म्हणजेच मालिका आता लवकरात लवकर आपल्याला पाहता येणार आहे. सुबोध भावे ह्याने यापूर्वी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आणि विविध मालिकांमध्ये कामं केली आहेत. त्याने साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्या आहेत. शिवानी सोनार हिच्या यापूर्वीच्या व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं आहे.मालिकाविश्वात ए.आय.वर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. 25 वर्षांपूर्वीचा सुबोध आणि आत्ताचा सुबोध अशा व्यक्तिरेखा या मालिकेत दिसणार आहेत.