Aggabai Sunbai | ठरलं! ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधला ‘हा’ अभिनेता साकारणार ‘बबड्या’ची भूमिका!

‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतील सर्वात महत्त्वाचं पात्र ‘बबड्या’ अर्थात ‘सोहम कुलकर्णी’ हे प्रचंड गाजलं होतं. या भूमिकेत असणारा अभिनेता आशुतोष पत्कीला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते.

Aggabai Sunbai | ठरलं! ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधला ‘हा’ अभिनेता साकारणार ‘बबड्या’ची भूमिका!
ठरलं! ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधला ‘हा’ अभिनेता साकारणार ‘बबड्या’ची भूमिका!
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 11:32 AM

मुंबई : प्रेक्षकांच्या लाडक्या असणाऱ्या बहुतेक सर्वच मालिका आता निरोप घेताना दिसत आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘अग्गबाई सासूबाई’ या दोन मालिका गेल्या कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेल्या ‘देवमाणूस’ आणि ‘लाडाची मी लेक गं’या मालिकाही आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे कळते आहे. या मालिकांच्या जागी आता ‘घेतला वसा टाकू नको’, ‘अग्गबाई सुनबाई’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘पाहिले न मी तुला’ या नव्या मालिका एंट्री घेणार आहेत (Adwait dadarkar will play babdya in new serial aggabai sunbai).

या पैकी सर्वात जास्त चर्चेत असलेलेई मालिका म्हणजे ‘अग्गबाई सुनबाई’. या मालिकेत आता आसावरी-अभिजीत यांचा संसार रेखाटला जाणार आहे. ‘संसार करणं इतकं सोप्पं नसतं’, असं सांगणारा एक प्रोमोसुद्धा प्रसारित झाला आहे. या प्रोमोमध्ये लाडक्या सुनबाई अर्थात ‘शुभ्रा’ या पात्राचं बदलेलं रूपडं पाहून प्रेक्षकांना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरताना आणखी एका धक्का म्हणजे मालिकेतील गाजलेलं पात्र ‘बबड्या’ अर्थात ‘सोहम’देखील एका नव्या रुपात दिसणार आहे. अर्थात अभिनेता आशुतोष पत्की यापुढे बबड्याच्या भूमिकेत दिसणार नाहीय. या भूमिकेसाठी अनेक कलाकारांची नावे घेतली जात होती. मात्र, आता एका अभिनेत्याचे नावं यासाठी नक्की करण्यात आले आहे. हा अभिनेता म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधला ‘सौमित्र’ अर्थात अद्वैत दादरकर!

‘बबड्या’साठी चुरस!

‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतील सर्वात महत्त्वाचं पात्र ‘बबड्या’ अर्थात ‘सोहम कुलकर्णी’ हे प्रचंड गाजलं होतं. या भूमिकेत असणारा अभिनेता आशुतोष पत्कीला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. मात्र, आता या मालिकेला सिक्वेल येत असून, आसावरी-अभिजीत यांच्या संसाराची कथा यातून दाखवण्यात येणार आहे. मात्र, यातील दोन मुख्य पात्र ‘शुभ्रा आणि सोहम’ यांना रिप्लेस करण्यात आलं आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने गाजवलेली शुभ्राची भूमिका आता अभिनेत्री उमा ऋषिकेश पेंढारकर साकारणार आहे. तर, आशुतोषची ‘बबड्या’ ही भूमिका अभिनेता अद्वैत दादरकर साकारणार आहे. ‘बबड्या’च्या भूमिकेसाठी अभिजीत खांडकेकरचे नावं देखील पुढे येत होते. मात्र, आता अद्वैतच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून, लवकरच तो चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे (Adwait dadarkar will play babdya in new serial aggabai sunbai).

(Adwait dadarkar will play babdya in new serial aggabai sunbai)

कोण आहे अद्वैत दादरकर?

टीव्हीवर गाजत असलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत भूमिका करत असलेला अद्वैत दादरकर म्हणजे नाटक आणि मालिका या दोन्ही माध्यमाची नस अचूक टिपणारा कलाकार. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेच्या ‘गुरुनाथ’ या ग्रे शेड असलेल्या नायकाला वरचढ चढणारी ‘सौमित्र’ची भूमिका चपखल वठवत अद्वैतने फॅनक्लबची कमानही चढती ठेवली आहे. अभिनय, लेखन, दिग्दर्शन असा तिहेरी प्रवास करणाऱ्या अद्वैतने मनोरंजन विश्वात स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या दोन्ही पर्वांचे दिग्दर्शन तसेच ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘गोष्ट तशी गंमतीची’, ‘प्रेमाच्या गावा जावे’ या नाटकांचे दिग्दर्शन अद्वैतने केले आहे. तर ‘तू माझा सांगाती’ मालिकेतील नारद, ‘शुभंकरोती’ मालिकेतील शशांकच्या भूमिकेतूनही तो प्रेक्षकांना भेटला. सध्या सौमित्र बनहट्टी बनून राधिकाच्या आयुष्यात सुख आणणाऱ्या ‘सौमित्र’मधून तो प्रसिद्ध झाला आहे.

(Adwait dadarkar will play babdya in new serial aggabai sunbai)

हेही वाचा :

Video : राखं झाली जगन्याची हाय तरी जीता भोळं प्रेयम माझं… शालूच्या झक्कास अदा, चाहते बघताच फिदा!

New Song : यशोमानचा रोमँटिक अंदाज, ‘तू इथे जवळी राहा’ गाणं लवकरच रसिकांच्या भेटीला!

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.