तर काय बिघडलं? सूरज चव्हाणला काळ्या, बोबड्या म्हणून हिणवणाऱ्यांसाठी दिग्दर्शकाची पोस्ट

Akshay Indikar Post About Suraj Chavan : प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून सूरज चव्हाणचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं आहे. दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. सूरज चव्हाण हा सिनेमाचा विषय वाटतो, असं अक्षय इंडीकर म्हणालेत. वाचा सविस्तर......

तर काय बिघडलं? सूरज चव्हाणला काळ्या, बोबड्या म्हणून हिणवणाऱ्यांसाठी दिग्दर्शकाची पोस्ट
सूरज चव्हाणImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 5:16 PM

सूरज चव्हाण… सामान्य घरातला मुलगा… त्याच्या साधेपणामुळे, बोबड्या बोलण्यामुळे अन् डायलॉगमुळे प्रसिद्ध झाला. गुलीगत धोका आणि बुक्कीत टेंगुळ अशा डायलॉगमुळे तरूणाईमध्ये त्याची क्रेझ निर्माण झाली. सूरज सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमधील स्पर्धक झालाय. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ते बिग बॉसचा स्पर्धक… हा सूरजचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. अनेकांनी त्याला हिणवलं. त्याच्या दिसण्यावरून त्याच्या बोलण्यावरून त्याला टोमणे मारले. पण सूरज खचला नाही. बिग बॉसच्या घरातही तो इतरांपेक्षा वेगळा भासतो त्याच्या याच शैलीमुळे….

प्रसिद्ध दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांनी सूरज चव्हाणवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी सूरजबाबत अक्षय यांची जुनी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. एका रोल च्या पल्याड जाऊन मला तरी सूरज चव्हाण हा एका सिनेमाचा, बायोपिकचा विषय वाटतो, असं अक्षय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अक्षय यांची पोस्ट जशीच्या तशी

जगणं विकणं आहे. कुणी स्वतःला कुणी ज्ञानाला कुणी बापजाद्याला कुणी हुंडा घेऊन तुंबडी भरून लग्न बाजाराला जगण्याच्या पराकोटीच्या लढाईत जर सूरज चव्हाण उतरून खेळायचं ठरवत असेल तर काय बिघडलं ? त्याला माहितीय तो काळाय ,त्याला माहितीय तो बोबडा आहे ,त्याला हे नीट माहिती आहे कि तो व्यंगासोबत न्यूनगंडात जिंदगीची काही वर्षे घालवून कफ्फलक होऊन जगलाय . World is flat च्या जमान्यात जग एका प्रतलावर आलं . इंटरनेट ने कुणाचीच एकहाती मक्तेदारी मनोरंजनाच्या जगावर असू शकत नाही याची ग्वाही दिली . मनोरंजन किती उथळ किती दर्जेदार याचे निकष ठरवण्याच्या फुटपट्टीच्या मालकीचा पारंपरिक अधिकार कुणाजवळ राहिला ठेवला गेला ह्याचं ज्ञान आपल्याला आहेच .मनोरंजन रंजयते इति अशी काहीशी संस्कृत व्याख्या . आता कुणाला कशातून मिळत असेल ? स्ट्रगल ,हिरो होणं हे ख्वाब ह्या गावकुसातल्या पोरांनी कधी बघायचं ? बघायला शिकवलं इंटरनेट ने . बापा काका मामाच्या आयत्या फ्लॅट वर मुंबईत जाऊन सूरज चव्हाण ऑडिशन देत उपाशी पोटी डाएट करून जिम करून जगणार होता का ? जिंदगीच्या नशिबात मनी असून देखील जाता येणार न्हवतंच . त्याला काही केल्या त्याच्या भवतालला अर्थ द्यावा वाटत असणार . कुठल्या तरी भुरट्या नेत्याच्या मागं वर्ष बरबाद करण्यापेक्षा पण त्याला वाटलं छोटे व्हिडीओ करावेत . केले आवडले नावडले . संख्येच्या अल्गोरिदम च्या बाजारात व्हियूज च्या नंबरच्या खेळात स्वतःला सिद्ध केलं . कुणी कितीही नाकं मुरडूदेत पण त्याला हे हवंय ते करत रहाण्याची आणि मुख्य म्हणजे न्यूनगंडाला स्वतःचा आत्मविश्वास बनवण्याची जीवघेणी कसरत करत सिनेमात अभिनय करतोय अशी बातमी वाचली . एका रोल च्या पल्याड जाऊन मला तरी सूरज चव्हाण हा एका सिनेमाचा बायोपिक चा विषय वाटतो . न्यूनगंडाने ग्रासलेल्या शंभरातील नव्व्याणव लोकांचा ननायक . खूप खूप अभिनंदन सूरज 😊

टीप : हि पोस्ट त्याच्या अभिनयाबद्दल नाही

-अक्षय इंडीकर ( लेखक ,दिगदर्शक )

Non Stop LIVE Update
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु.
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले.
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?.
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान.
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध.
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील.
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.