खिलाडी कुमार थिरकणार ‘झापुक झुपुक’वर..; वर्षा उसगांवकरांना म्हणाला…
Khel Khel Me Movie Team in Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्याचा 'भाऊचा धक्का' पार पडला. भाऊचा धक्क्यावर यावेळी 'खेल खेल में' सिनेमाची टीम आली आहे. यावेळी खिलाडी कुमार 'झापुक झुपुक'वर थिरकला. भाऊचा धक्क्यावर काय काय घडणार? वाचा सविस्तर...
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्याचा ‘भाऊचा धक्का’ पार पडत आहे. काल पहिला भाग झाला. आता आज रविवारीदेखील ‘भाऊचा धक्का’ होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर ‘खेल खेल में’ या चित्रपटाची टीम कल्ला करणार आहे. त्यांच्या कल्ल्याने रविवारचा ‘भाऊचा धक्का’ एकदम झापुक झुपुक होणार आहे. कालच्या भागात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने सदस्यांना चांगलाच धडा शिकवला. तर काहींचं कौतुक केलं. आता घरातील खिलाडींना भेटायला भाऊच्या धक्क्यावर खास बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार हजेरी लावणार आहे.
खिलाडी कुमार थिरकणार ‘झापुक झुपुक’वर..
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारसह फरदीन खान, वाणी कपूर, अम्मी विर्क, प्रज्ञा जायसवाल आणि आदित्य सील हे कलाकारदेखील ‘भाऊच्या धक्क्या’ वर हजेरी लावणार आहेत. अक्षय कुमारच्या येण्याने भाऊच्या धक्क्याला एक वेगळाच रंग येणार आहे. यावेळी बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. सूरजच्या स्टाईलने भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख आणि खिलाडी कुमार आणि ‘खेल खेल में’ सिनेमाची टीम झापुक झुपुक थिरकताना प्रोमोमध्ये दिसत आहेत. एकंदरीतच आजचा भाऊचा धक्का एकदम ‘खेल खेल में’ स्टाईलने होणार आहे.
वर्षा उसगांवकरांना म्हणाला…
‘बिग बॉस मराठी’ भाऊचा धक्क्यावर बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावरून अक्षय कुमार स्पर्धकांशी संवाद साधतोय. यावेळी वर्षा उसगांवकर यांना ‘वर्षा किती वर्षांनी दिसतेस’ असं अक्षय कुमार म्हणतो. ‘घरात मटन मिळतंय की नाही’ असं तो डीपी अर्थात धनंजय पोवारला विचारतो.
View this post on Instagram
अक्षय कुमार बिग बॉसच्या घरात आल्यावर मजा मस्ती होणार नाही, असं तर शक्य नाही. अक्षय कुमारने जान्हवी किल्लेकरचा फोन आणला आणि त्यातले मेसेज अक्षय कुमारने वाचले. हे मेसेज टीव्हीवर वाचून दाखवू का? असं अक्षय म्हणत होता. ‘साक्षी- 2’ या नावाने सेव्ह असलेल्या नंबरचे मेसेज वाचून दाखवू का? असं अक्षय म्हणतो. पण जान्हवी वाचू नका असं सांगते. आता खिलाडी कुमार तिच्या फोनमधले मेसेज वाचून दाखवणार की नाही? हे पाहण्यासाठी आजचा भाग पाहावा लागेल.