आमीर खान आणि जुनैद खान पहिल्यांदाच एकत्र दिसणार छोट्या पडद्यावर

Amir Khan and Junaid Khan : अभिनेता आमीर खान आणि त्याचा लेक जुनैद खान पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. पहिल्यांदाच बापलेक स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. यावेळी अमिताभ बच्चन देखील आमीर आणि जुनैदसोबत दिसतील. कोणत्या कार्यक्रमात एकत्र दिसणार? वाचा सविस्तर...

आमीर खान आणि जुनैद खान पहिल्यांदाच एकत्र दिसणार छोट्या पडद्यावर
अमीर खान, जुनैद खान, अमिताभ बच्चनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 10, 2024 | 3:06 PM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमीर खान आणि त्याचा लेक जुनैद पहिल्यांदाच एकत्र स्क्रिनवर दिसणार आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांचा उद्या (11 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जात आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात खास पाहुणे येणार आहेत. अमिताभ बच्चन यांचा 82 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी अभिनेता आमीर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान उपस्थित असणार आहे. जुनैद आणि आमिर पहिल्यांदाच ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत.

अमिताभ बच्चन यांच्याकडून जुनैदचं कौतुक

आमीर खान आणि त्याचा लेक जुनैद हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदा एकक्ष स्क्रिनवर दिसणार आहेत. आमीरचा लेक जुनैदने ‘महाराज’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘महाराज’ या चित्रपटातील अभिनयासाठी अमिताभ बच्चन यांनी जुनैद खानचं कौतुक केलं. ‘कौन बनेगा करोडपती’च्या उद्याच्या ‘महानायक का जन्मोत्सव’ या विशेष भागात आमीर आणि जुनैद एकत्र छोट्या पडद्यावर दिसणार आहेत.

महाराज सिनेमाचा किस्सा

तुझ्या वडिलांनी बॉलिवूडमध्ये इतकं काम केलं आहे. या अनुभवातून तू काय शिकला? असा प्रश्नही अमिताभ बच्चन यांनी जुनैदला विचारला. पण आमीरने यावर उपरोधितपणे उत्तर दिलं. सुरुवातीला मी जुनैदला हा चित्रपट करू नकोस, असं सांगितलं होतं. कारण त्याने अनेक स्क्रीन टेस्ट दिल्या होत्या आणि प्रत्येक वेळी त्याला नकार मिळत होता. पण ‘महाराज’मध्ये मात्र त्याची निवड झाली. त्यामुळे मला वाटलं की, त्याने हा चित्रपट करू नये, असं आमीर खान म्हणाला. जुनैदने यावर मला सांगितलं की हा एकमेव चित्रपट मला मिळाला आहे. जर हा केला नाही तर अभिनयाची सुरुवात कशी करणार? , असंही आमीर म्हणाला.

जुनैद खानने यावर त्याचं उत्तर दिलं. मला थिएटर स्कूलमध्ये जायची इच्छा होती. डॅडने त्याला परवानगीही दिली आणि मला एक मौल्यवान सल्ला दिला. ते म्हणाले की, अनुभवाने तू अभिनय कुठेही शिकू शकतोस. पण जर तुला भारतीय चित्रपट क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल. तर तुला हिंदी भाषा आणि आपल्या देशाची संस्कृती नीट समजली पाहिजे. देशातल्या लोकांना तू भेटलं पाहिजे. नाहीतर, तू मोठा अभिनेता होशील खरा… पण उपरा ठरशील, असं जुनैद म्हणाला.

'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?.
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक.
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव.
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती.
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास.
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....