छोट्या पडद्यावरील मनोरंजन विश्वासात ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेची चर्चा आहे. कारण मराठीत नव्हे तर संपूर्ण देशात एखाद्या मालिकेत प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा (एआय) वापर करण्यात आला आहे. सोनी मराठीवर वाहिनीवर ८ जुलैपासून ही मालिका येत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे याने डबल रोल केला आहे. एक पन्नासीच्या जवळ पोहचलेला सुबोध भावे तर दुसरा २५ वर्षांपूर्वीचा कॉलेजमधील सुबोध भावे आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिकेत आहे. या मालिकेमध्ये सुबोधने डबल रोल केल्यामुळे त्याला डबल मानधन मिळाले असणार? असा प्रश्न सुबोध भावे याला विचारण्यात आला. यावेळी त्याने मजेशीर उत्तर दिले. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या पत्रकार परिषदेत सुबोध भावे याने हे उत्तर दिले. या पत्रकार परिषदेला सुबोध भावे, शिवानी सोनार यांच्यासह सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भालवनकर उपस्थित होते.
सुबोध भावे मानधनाच्या मुद्यावर बोलताना म्हणाले, तुम्ही मालिकेचा प्रोमो पाहिला. त्या प्रोमोमध्ये वर्ष १९९९ वर्ष दिले आहे. त्यामुळे त्या रोलचे मानधन १९९९ प्रमाणे मिळते. १९९९ मध्ये कलाकारांना ५० रुपये मानधन मिळत होते. ते मानधन मला मिळते. मी ते माझ्या दोन्ही मुलांमध्ये वाटतो. त्यांना खाऊसाठी ते पैसे होतात. परंतु २०२४ मध्ये मिळालेले मानधन माझ्यासाठी असते. सुबोध भावे याच्या या उत्तरानंतर सभागृहात चांगलाच हशा फिकला.
सोनी मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिका येत्या ८ जुलैपासून रोज रात्री ९ वाजता सुरु होणार आहे. या मालिकेत सुबोध भावे डबल रोलमध्ये आहे. त्यात प्राध्यापक असलेला सुबोध भावे आता दिसतो, तसाच आहे. परंतु २५ वर्षांपूर्वीचा माही म्हणजे सुबोध भावे एआयचा वापर करुन साकरण्यात आला आहे. त्यासाठी सोनी टीव्हीच्या ४० अभियंत्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून रात्रंदिवस मेहनत घेतली. त्यानंतर मालिका विश्वातील हा प्रयोग समोर आल्याचे सोनी टीव्ही मराठीचे बिझनेस हेड अजय भालवनकर यांनी सांगितले.
‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका प्रेमकथा आहे. सुबोध भावे आणि शिवाणी सोनार हे कलाकार प्रमुख भूमिकेत या मालिकेत आहेत. शिवानी सोनार ही वेगवेगळ्या मालिकांमधून यापूर्वीच घराघरांत पोहोचली आहे. आता सुबोधसोबत नवीन अंदाजात ती दिसणार आहे.