Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | माझ्या रशियन बायकोचे हिंदू धर्मांतर, राहुल महाजनच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट

नताल्या रशियन आहे, मात्र तिने स्वतःला हिंदू धर्मात परिवर्तित केलं आहे, असं राहुल महाजनने बिग बॉसच्या घरात जाताना सांगितलं

Bigg Boss 14 | माझ्या रशियन बायकोचे हिंदू धर्मांतर, राहुल महाजनच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 3:18 PM

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा चिरंजीव राहुल महाजन पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त कलाकारांच्या यादीत राहुल महाजन मोडतो. बिग बॉसच्या चौदाव्या सिझनमध्ये राहुल महाजन चॅलेंजर म्हणून सहभागी होणार आहे. माझ्या रशियन बायकोने हिंदू धर्मात परिवर्तन केले असून मीही अध्यात्माच्या मार्गावर आहे, असं राहुल महाजनने सांगितलं. (Bigg Boss 14 Challenger Rahul Mahajan says his Russian wife Natalya Ilina has converted to Hinduism)

‘बिग बॉस’ सेलिब्रिटी म्हणून राहुल महाजनला खरी ओळख मिळाली. मात्र बिग बॉसच्या पलिकडेही राहुलचं आयुष्य वाद-विवादांनी व्यापलेलं आहे. त्याच्या आधीच्या पत्नी श्वेता सिंह आणि डिम्पी गांगुली यांनी राहुलवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात सहभागी होण्यापूर्वी राहुल महाजन ड्रग्ज स्कँडलमध्येही अडकला होता. मात्र ते आयुष्य मागे सोडून आता अध्यात्माला जवळ केल्याचं राहुल सांगतो.

राहुल-नताल्यात 18 वर्षांचं अंतर

राहुल आणि नताल्या यांच्या वयात 18 वर्षांचं अंतर आहे. राहुल 45 वर्षांचा आहे, तर नताल्या 27 वर्षांची. कझाखिस्तानच्या नताल्यासोबत नोव्हेंबर 2018 मध्ये तो विवाहबंधनात अडकला, तेव्हा सारेच चकित झाले होते. गाजावाजा करुन केलेली दोन लग्नं टिकली नाहीत, पण तिसरं लग्न साधेपणाने केल्याचं राहुल त्यावेळी म्हणाला होता.

बालमैत्रीण श्वेता सिंहसोबत लगीनगाठ

श्वेता सिंहसोबत राहुल महाजनचा प्रेमविवाह झाला होता. तब्बल तेरा वर्षांच्या ओळखीनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जुलै 2006 मध्ये श्वेता-राहुलचं लग्न झालं, मात्र डिसेंबर 2007 मध्ये श्वेताने राहुलवर छळाचे आरोप करुन घटस्फोट घेतला.

रिअॅलिटी शोमधून वधूपरीक्षा

‘राहुल दुल्हनिया ले जायेंगे’ या रिअॅलिटी शोमधून वधूपरीक्षा घेत राहुल दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला. या शोची विजेती डिम्पी गांगुलीसोबत त्याने दुसरं लग्न केलं. नच बलिये या डान्स रिअॅलिटी शोमध्येही डिम्पी-राहुल एकत्र सहभागी झाले. मात्र छोट्या पडद्यावर दिसणारी त्यांची केमिस्ट्री प्रत्यक्षात जुळली नाही. हा विवाहही अवघे काही महिनेच टिकला. डिम्पीनेही कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत हे नातं तोडलं.

आम्ही रेल्वेचे दोन रुळ

“आम्ही रेल्वेच्या दोन रुळांप्रमाणे आहोत. आम्ही एकमेकांच्या कामात फारसा हस्तक्षेप करत नाही. दोघांनी परस्परांची स्पेस जपली आहे, आमचा विवाह योग्य मार्गावर राहण्यासाठी आम्ही समतोल साधला आहे.” असं राहुलने ‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. दोन वर्षांपूर्वी राहुलने नताल्या इलियानासोबत विवाह केला.

View this post on Instagram

Bigg Boss 14 Challenger Rahul Mahajan says his Russian wife Natalya Ilina has converted to Hinduism

A post shared by Rahul Mahajan (@therahulmahajan)

शिव-पार्वती आदर्श जोडपं

“नताल्या रशियन आहे, मात्र तिने स्वतःला हिंदू धर्मात परिवर्तित केलं आहे. मी नेहमी तिला शिव-पार्वती यांचं उदाहरण देतो. पती आणि पत्नीचं नातं हे शंकर पार्वतीसारखं असावं, असं मी तिला सांगत असतो. आमच्या नात्याचे ते आदर्श आहेत. मी तिला भगवद्गीता शिकवतो. आम्ही अनेक आध्यात्मिक पुस्तकं एकत्र वाचतो. उत्तम जोडीदार आणि कुटुंब मिळण्यासाठी तुम्हाला चांगलं भाग्य लागतं” अशा भावना राहुल महाजनने व्यक्त केल्या.

खोटी मैत्री नको

यापूर्वी रंगीन आयुष्य जगल्यानंतर आपल्याला बिग बॉस 14 मधील महिलांपासून दूर राहायचे आहे, असंही राहुल महाजनने स्पष्ट केलं. “मी नताल्यासोबत हॅपिली मॅरीड आहे. मला घरातील सर्व स्त्रियांपासून दूर जायचे आहे. मला आणखी लिंक-अप्स नको. मला बिग बॉसच्या घरात खोटी मैत्रीही नको” असं राहुलने सांगितलं.

संबंधित बातम्या 

Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!

Bigg Boss 14 | निक्की तांबोळीने केला राहुल वैद्यवर गंभीर आरोप

(Bigg Boss 14 Challenger Rahul Mahajan says his Russian wife Natalya Ilina has converted to Hinduism)

हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक.
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू.
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल.
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल..
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल...
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले.
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?.
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप.
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात.
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.