Video | ‘आजचा दिवस नवा’ म्हणत ‘Bigg Boss 14’ची ‘ही’ स्पर्धक करतेय पूलमध्ये धमाल! पाहा तिचा व्हिडीओ…
बॉलिवूड अभिनेत्री कश्मीरा शाह अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड आणि बिनधास्त शैलीमुळे कायम चर्चेत असते. बर्याचदा कश्मीरा तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कश्मीरा शाह अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड आणि बिनधास्त शैलीमुळे कायम चर्चेत असते. बर्याचदा कश्मीरा तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. अलीकडेच ‘बिग बॉस 14’मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ती चॅलेंजर म्हणून शोमध्ये गेली पण, लवकरच त्या घराबाहेर पडली. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर कश्मीराच्या चाहत्यांना तिचा खूपच बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे (Bigg Boss 14 contestant Kashmera Shah shares bikini video on social media).
नुकताच कश्मीरा शाहचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. ब्लॅक बिकिनीमध्ये कश्मीरा खूपच बोल्ड आणि मादक दिसत आहे. त्याच वेळी, तिचा फिटनेस पाहून चाहते देखील आश्चर्य चकित झाले आहेत. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कश्मीराचा बोल्ड अंदाज
View this post on Instagram
कश्मीरा शाहने नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती काळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत आहे. यावेळी कश्मीरा तरण तलावाजवळ अर्थात स्वमिंग पूलजवळ उभी असलेली दिसत आहे. इतकेच नाही तर, व्हिडीओमध्ये ती आपल्या वेगवेगळ्या अदांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.
कश्मीराची ही शैली चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. कश्मीराच्या या व्हिडीओमध्ये सुपरहिट गाणे ‘बाहोमे चले आओ’ हे गाणे वाजत आहे. तसेच, हा व्हिडीओ शेअर करताना कश्मीराने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज एक नवीन दिवस आहे, आपला भूतकाळ विसरा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. लवकरच उद्याचा दिवस आपला असेल.’(Bigg Boss 14 contestant Kashmera Shah shares bikini video on social media)
कश्मीराचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत
कश्मीराचा आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये कश्मीरा ‘कुली नंबर 1’च्या ‘हूस्न है सुहाना’ या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. हा व्हिडीओ शेअर करताना कश्मीराने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘वरुण आणि सारा या उत्कृष्ट गाण्यावर नाचण्यापासून मी स्वत:ला रोखू शकत नाही’. कश्मीराची ही स्टाईल जोरदार व्हायरल झाली आणि चाहत्यांनाही ती खूप पसंत पडली.
सोशल मीडियावर सक्रिय कश्मीरा
कश्मीरा आपल्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तिने अनेक वेळा तिचे बोल्ड व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. जे तिच्या चाहत्यांनाही हे खूप आवडले आहेत.
कश्मीरा अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी आहेत. दोघांची जोडी इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. कश्मीरा वयाने कृष्णापेक्षा खूप मोठी आहे. या जोडप्याला सरोगसीद्वारे जन्मलेले दोन मुलगे देखील आहेत. अलीकडेच कश्मीरा तिचा नवरा कृष्णा सोबत या कपिल शर्माच्या कार्यक्रमात दिसली होती. या मंचावर दोघांनीही त्यांच्या जीवनाविषयी अनेक खुलासे केले होते.
(Bigg Boss 14 contestant Kashmera Shah shares bikini video on social media)
हेही वाचा :
सोनू सूदच्या ‘त्या’ ट्विटवर संतापले नेटकरी! सोशल मीडियावर ट्रेंड केला #WhoTheHellAreUSonuSood
Kapil Sharma | रणबीर-आलिया-संजयच नाही, तर कपिल शर्मालाही बसला कोरोनाचा मोठा फटका!