Nikki Tamboli | ‘बिग बॉस 14’ची स्पर्धक निक्की तंबोलीला कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!

कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस 14’ या रिअॅलिटी शोची बहुचर्चित स्पर्धक अभिनेत्री निक्की तंबोली (Nikki Tamboli) हिला कोरोनाची लागण झाली आहे.

Nikki Tamboli | ‘बिग बॉस 14’ची स्पर्धक निक्की तंबोलीला कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 4:12 PM

मुंबई : कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस 14’ या रिअॅलिटी शोची बहुचर्चित स्पर्धक अभिनेत्री निक्की तंबोली (Nikki Tamboli) हिला कोरोनाची लागण झाली आहे. निक्कीने ही माहिती तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे आणि स्वत:ला क्वारंटाईन केल्याचे तिने म्हटले आहे. निक्कीच्या या पोस्टनंतर अनेक सेलिब्रिटींनी तिला ‘गेट वेल सून’ म्हणून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. यामध्ये अभिनेता अभिनव शुक्ला, मनु पंजाबी यांच्यासह अनेक कलाकारांची नावे आहेत. कलाकारांसह निकीचे चाहतेही ती लवकर बरी व्हावी, म्हणून प्रार्थना करत आहेत (Bigg Boss 14 fame actress Nikki Tamboli tested corona positive).

निक्कीने तिच्या सोशल मीडियावर लिहिले की, ‘आज सकाळी मला कळले की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला अलगीकरणात ठेवलेले आहे आणि सर्व नियमांचे पालन करून मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना माझी विनंती आहे की, त्यांनी त्यांची स्वतःची कोविड टेस्ट करुन घ्यावी. तुमचे प्रेम आणि समर्थनाबद्दल मी नेहमीच आभारी आहे. सुरक्षित रहा आणि नेहमीच मास्क घाला. हात स्वच्छ करा आणि सामाजिक अंतर पाळा.’

पाहा निक्कीची पोस्ट

बिग बॉसने निक्कीला दिली नवी ओळख!

बिग बॉसच्या 14व्या सीझनने निक्कीला एका वेगळी ओळख मिळवून दिली आहे. या पर्वात रुबिना दिलैक विजेती ठरली. तर, राहुल वैद्य उपविजेता आणि निक्की तांबोळी ही रनरअप ठरली होती. सध्या बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर निक्की सतत तिच्या मित्रांसोबत वेळ घालवताना दिसते. अलीकडेच एक प्रोजेक्ट पूर्ण करून, ती चंदीगडहून परत आली आहे. मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या निक्की तंबोलीने बर्‍याचदा सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर केले आहेत. तिने आतापर्यंत अनेक तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मूळची महाराष्ट्रातील औरंगाबादची रहिवासी असलेली निक्की दक्षिणेतील ‘कांचना 3’ या सुपरहिट चित्रपटात दिसली होती (Bigg Boss 14 fame actress Nikki Tamboli tested corona positive).

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झाली ट्रोल

काही दिवसांपूर्वी व्ही जे अँडी कुमार यांनी निक्की तंबोलीची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत निक्की तंबोलीने पुन्हा एकदा खुलासा केला आहे की, अली गोनीसाठी तिच्या हृदयात सॉफ्ट कॉर्नर आहे. अलीचे नाव घेतना निक्की लाजतानाही दिसली.  एवढेच नाही तर, जेव्हा अँडीने निक्कीला विचारले की, अली गोनीबरोबर डेटवर जायला आवडेल का? यावरही निक्कीने लाजत होकारार्थी उत्तर दिले. यावर अली आणि जास्मीनचे चाहते रागावले आणि त्यांनी निक्कीला खूप ट्रोल केले.

(Bigg Boss 14 fame actress Nikki Tamboli tested corona positive)

हेही वाचा :

Video | आपल्या गोड आवाजाने अरुणिताने लावलंय प्रेक्षकांना वेड, ‘या’ कारणामुळे सध्या आलीय चर्चेत! पाहा व्हिडीओ…

Good News | आयुष्मान खुरानाच्या घरी येणार चिमुकला पाहुणा, भाऊ अपारशक्ती होणार ‘बाबा’!

'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर.
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?.
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?.
कराडवर मकोका लावण्यासाठी अल्टिमेटम, मस्साजोगमध्ये नेमकं काय-काय घडलं?
कराडवर मकोका लावण्यासाठी अल्टिमेटम, मस्साजोगमध्ये नेमकं काय-काय घडलं?.
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.