Bigg Boss 15 : सलमान खाननं उडवली अभिजित बिचकुलेची खिल्ली; म्हणाला, डान्सचा डी सुद्धा…
बिग बॉस(Bigg Boss)च्या सेलिब्रेशनमध्ये सलमान खान(Salman Khan)नं सर्वांसोबत नवीन वर्षाचं स्वागत केलं. नव्या एपिसोडमध्ये सलमान खाननं अभिजित बिचकुले(Abhijeet Bichkule)ची खिल्ली उडवली आणि असं काही बोलला की त्यानंतर सगळे हसायला लागले.
मुंबई : 31 डिसेंबरचा जल्लोष तर झाला. सर्वत्र नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. संपूर्ण जग नवीन वर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा करत आहे. कलर्स टीव्हीच्या बिग बॉस 15 या शोमध्ये घरातले स्पर्धक घरात नवीन वर्ष साजरं करत होते. बिग बॉस(Bigg Boss)च्या या सेलिब्रेशनमध्ये सलमान खान(Salman Khan)नं सर्वांसोबत नवीन वर्षाचं स्वागत केलं. नव्या एपिसोडमध्ये हे पाहायला मिळणार आहे. या एपिसोडमध्ये सलमान खाननं अभिजित बिचकुले(Abhijeet Bichkule)ची खिल्ली उडवली आणि असं काही बोलला की त्यानंतर सगळे हसायला लागले.
सर्वात चर्चेतला स्पर्धक कलर्स टीव्हीच्या लेटेस्ट शोमध्ये संगीत उद्योगातले दोन तरुण आणि प्रसिद्ध चेहरे, जन्नत जुबेर आणि सिद्धार्थ निगम यांच्यासह टेलिव्हिजन इंडस्ट्रीतले अनेक नामांकित कलाकार उपस्थित होते. सलमाननं सगळ्यांसोबत धमाल केली. या शोचा स्पर्धक अभिजित बिचकुळे हा या शोचा हाऊसमेट आहे. तो सर्वाधिक चर्चेत असणारा स्पर्धक आहे. आपल्या विचित्र स्वभावानं आधीच त्यानं लक्ष वेधून घेतलंय. या एपिसोडमध्ये पाहुण्यांशी बोलताना सलमाननं अनेकवेळा अभिजित बिचकुलेचा उल्लेख केला. अनेकवेळा सलमान अभिजितच्या नावाची खिल्लीही उडवताना दिसला.
डान्स आणि म्यूझिक सलमान खान सिद्धार्थ निगमच्या डान्सचं कौतुक करत होता. या स्तुतीदरम्यान सलमान खाननं अभिजितचा उल्लेख करत गंमतीनं म्हटलं, की “डान्सचा डी, म्युझिकचा मसुद्धा त्या सुकलेल्या नाना पाटेकरला येत नाही. यावर सगळेच हसले. सलमान खान पहिल्यांदा हे करत नव्हता, तो अनेकदा अभिजित बिचकुलेची खिल्ली उडवतो. अभिजितही सलमानच्या या जोक्सचा आनंद घेतो.
गाण्याची उडवली होती खिल्ली या शोच्या आधी, त्याला सलमाननं गायक शेखर रावजियानीसमोर गाण्यास सांगितलं होतं. जेव्हा अभिजितनं त्याचा परफॉर्मन्स दिला तेव्हा त्यानं गायकाला त्याची रचना ऐकण्यास सांगितलं. यावर सलमाननं लगेच प्रतिक्रिया दिली आणि त्याला बसण्यास सांगितलं आणि जेव्हा अभिजित बसला नाही, तेव्हा सलमान म्हणाला, की शांत बस. सलमाननं एकदा म्हटलं होतं, की अभिजित फक्त टीव्हीवर गातो, किमान त्यावेळी चॅनल बदलण्याचा पर्याय प्रेक्षकांना असतो.